suvichar

टीव्ही अभिनेता संपत जे राम यांची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2023 (11:14 IST)
कन्नड इंडस्ट्रीतील टीव्ही अभिनेता संपत जे राम यांचे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार संपतने वयाच्या ३५ व्या वर्षी आत्महत्या केली आहे. 22 एप्रिल रोजी त्यांनी नेलमंगळा येथील राहत्या घरी आत्महत्या केली. अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
संपतला बऱ्याच दिवसांपासून काम मिळत नव्हते, त्यामुळे ते नैराश्याखाली होते. या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा मार्ग उचलला. मात्र, या प्रकरणी अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून किंवा मित्रांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
अभिनेत्याच्या निधनाने कन्नड इंडस्ट्री दु:खात बुडाली आहे.सर्व सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि संपत जे राम यांना श्रद्धांजली वाहिली. असे म्हटले जात आहे की अभिनेता देखील बर्याच काळापासून पैशाच्या तुटवड्याशी झुंजत होता. 'अग्निसाक्षी' या टीव्ही मालिकेतून या अभिनेत्याला घरोघरी ओळख मिळाली. या मालिकेद्वारे त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' च्या स्क्रीनिंगला दीपिका पदुकोण गैरहजर; चाहत्यांचा प्रश्न: "रणवीर सिंह यांची पत्नी कुठे आहे?"

धुरंधरची सारा अर्जुन: एका बालकलाकारापासून ते उगवत्या स्टारपर्यंत

प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेता चक नॉरिस यांचे निधन

'बायको' आणि 'गर्लफ्रेंड' यांच्यात काय फरक ?

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

पुढील लेख
Show comments