Marathi Biodata Maker

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

Webdunia
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (12:02 IST)
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा 'कुछ कुछ होता है' ऑक्टोबर 1998 रोजी रिलीज झाला होता. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जीच्या या प्रेमाच्या त्रिकोणाने तेव्हाच्या अख्ख्या पिढीला येड लावले होते. 
 
या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्याच्याशी संबंधित काही आठवणींना उजाळा दिला गेला. कुछ कुछ..मधील राणी मुखर्जीचा रोल हा अगोदर करण जोहरने ट्‌विंकल खन्नाला देऊ केला होता. मात्र ट्‌विंकलने हा रोल करण्यास नकार दिला होता. या रोलसाठी करणने अन्य काही बड्या हिरोईनशीही बोलणे केले होते. पण दुय्यम भूमिका असल्याचे वाटून सगळ्यांनी नकार दिला होता. सरतेशेवटी ट्‌विंकलच्या शिफारसीनुसार या रोलसाठी राणी मुखर्जीची निवड झाली होती. तिने हा रोल स्वीकारला तेव्हा राणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अगदी नवीन होती. पण कुछ कुछ..च्या रोलमुळे राणीच्या ग्लॅमरमध्ये खूपच वाढ झाली होती. थोडक्यात तिचे फिल्मी करिअर एकदम सुपरफास्ट झाले. कुछ कुछ होता है..च्या निमित्तिाने आयोजित एका पार्टीमध्ये ट्‌विंकलखन्नाही आली होती. तिथे तिने राणीला आठवण करून दिली की तुझे करिअर माझ्यामुळे यशस्वी झाले आहे. कुछ कुछ..मधील रोल तुला दिल्यामुळेच तुला बॉलिवूमडध्ये हिट ब्रेक मिळाला होता. खरे तर अशाप्रकारे कोणीही उपकारांची आठवण करून देऊ नये. पण राणीने ट्‌विंकलच्या या बोलण्याचे वाईट वाटून घेतले नाही. उलट तिचे आभारच मानले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

पुढील लेख
Show comments