rashifal-2026

नृत्याने वाढेल तुमचा आत्मविश्वास -शामक दावर

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (12:22 IST)
अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजा सर्वांना माहीत आहेत. पण यासोबतच शिक्षणसुद्धा तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे. आजच्या युगात शिक्षणाशिवाय कुछलाच पर्याय नाही. शिक्षणासाठी जगभरातून लोकांचे भ्रमण होत असते, कोणी परदेशी शिक्षणासाठी जातं तर कोणी आपल्याच मायदेशी शिक्षण घेण्याचं ठरवतं. सध्याचं युग हे स्पर्धेचे युग आहे. शिक्षणासाठी, कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा सुरू असतात. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की, या क्षेत्रातील स्पर्धकच आपणास अधिक पाहावयास मिळतात. विज्ञान-तंत्रज्ञानासोबत, कला, क्रीडा, संगीत शिक्षणातही कमालीची प्रगती झाल्याची आपणास पाहावयास मिळते. भारत शिक्षणासाठी सर्वोत्तम असा देश समजला जातो. विश्वातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतात. भारतीय नृत्यकला हि खूप जुनी आणि सर्वोत्तम असल्याने भारतात नृत्यशिक्षणाला खूप महत्व आणि नृत्याचा सन्मान केला जातो. आजच्या फ्युजनच्या विश्वात सर्वांना क्लासिकल सोबत वेस्टर्न डान्स स्टाईल शिकण्याची कुतुहुलता निर्माण झाल्याचे दिसते. 
भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजेच "बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री'चं सर्वांनाच आकर्षण आहे. बॉलिवूड चित्रपट हे ऍक्शन, आणि फुल्ल ऑन ड्रामाने भरलेला आहे. याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे "डान्स" ! बॉलिवूड डान्स स्टाईल ही जगप्रसिद्ध आहे, हटके डान्स मुव्हस्, गाण्यांमुळे प्रेक्षकवर्ग आकर्षित होत असतो. चित्रपटातील नृत्य शिकणे आणि शिकवणे हे जितके मनोरंजक असते तितकेच आव्हानात्मकदेखील असते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हेच काम अगदी चोखपणे निभावणारे एकमेव नृत्यदिग्दर्शक म्हणजे "शामक दावर"... 
शामक दावर हे नाव आपल्यासमोर आलं कि सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ते, त्याची स्वत:ची अशी वेगळी डान्स थीम, निरनिराळे ड्रेसिंग स्टाईल्स आणि क्लासिकल आणि वेस्टर्न डान्स स्टाईलचा भन्नाट मेळ असलेले डान्स स्टाईल. "दिल तो पागल है" या चित्रपटामधून शामक यांनी सिने इंडस्ट्रीमध्ये "एंट्री" घेतली. चित्रपट गाण्यांशिवाय शामक यांची नृत्यशाळादेखील सुरु केली. "नृत्यशिक्षण" ही फक्त कला नव्हे तर एक करियरचा पर्याय होऊ शकतो असे शामक दावर यांचे म्हणणे आहे. 
 
आपल्या समाजात अपंग व्यक्ती किंवा अपंग मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अपंग व्यक्ती हे आधाराव्यतिरिक्त काहीही हालचाल करू शकत नाही. पण शामक यांनी अपंगांची कमजोरी ही त्यांची ताकद बनवली. "विक्ट्री आर्ट फाऊंडेशन" ही नृत्यशाळा खास अपंग मुलांसाठी असून नृत्यातून त्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ बनवण्यासाठी सुरू करण्यात आली. "विक्ट्री आर्ट फाउंडेशन" मधील व्हीलचेयर वर बसलेली मुले आज डान्स इन्स्ट्रक्टर अर्थात प्रशिक्षक म्हणून याच संस्थेत कार्यरत आहेत. अपंगत्वावर मात करून प्रगतीच्या शिखरावर पोहोचवण्याचे काम "विक्ट्री आर्ट फाऊंडेशन" करते. 
चौकटीबाहेर जाऊन नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा ठेवणारे शामक दावर हे त्यांच्या कामातून आपला हटके अंदाज सर्वांसमोर दाखवत असतात. देशातच नव्हे तर परदेशात त्यांनी आपल्या नृत्यशाळा सुरु ठेवल्या आहेत. या नृत्यशाळेत एकवर्षीय नृत्यशाळा, उन्हाळी सुट्यांमध्ये "समर फंक" तर हिवाळी सुट्ट्यांमध्ये "विंटर फंक" अशा मुलांसाठी खास बॅचचे आयोजन केले जाते. त्याच प्रमाणे लहान आणि तरुणांप्रमाणेच वृद्धांनीसुद्धा आपले शरीर सुदृढ ठेवावे यासाठी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी डान्स क्लासचे आयोजन केले जाते. शामक स्टाईल नृत्याव्यतिरिक्त शामक अनेक वेगळे प्रकारही इथे शिकवतो.  
 
स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपले काम हे जगावेगळे असावे आणि हीच शिकवण शामक दावर त्यांच्या शिकवणीतून देत आहेत. आत्मविश्वास व बळाच्या जिद्दीवर कोणीही व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकतो असा आत्मविश्वास या मुलांमध्ये निर्माण करण्यात शामक नक्कीच यशस्वी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

सलमान खानच्या गाडीत गणेशमूर्ती दिसली, चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली

Pawna Lake लोणावळ्याजवळील अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

पुढील लेख
Show comments