suvichar

अरबाजसोबत झाला निकाह शूरा खान आहे तरी कोण?

Webdunia
गुरूवार, 28 डिसेंबर 2023 (20:18 IST)
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान नुकताच विवाहबद्ध झाला.मुंबईत कुटुंबियांच्या उपस्थितीत अरबाज आणि शूरा खान यांचा निकाह पार पडला. खरं तर दोन- तीन दिवसांपासून अरबाज आणि शूरा यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. आता दोघांचा निकाह देखील पार पडला.
 
अरबाज आणि शूरा यांच्या निकाहचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न म्हणजे ही शूरा आहे तरी कोण? खरं तर फिल्म इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट असलेल्या शूराबद्दल फार काही माहिती उपलब्ध नाहीये. तिचे फोटोही फार समोर आले नाहीयेत.
 
शूरा खान ही रवीना टंडन आणि तिची मुलगी रशा थडानी यांची व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. जेव्हा अरबाज खान जॉर्जियासोबत रिलेशनशीपमध्ये होता, तेव्हा शूरा आणि अरबाज यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, दोघं डेट करत असल्याची माहिती कोणालाही नव्हती.
 
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा असून नाव अरहान खान असं त्याचं नाव आहे. अरबाज खानचे आई आणि वडीलही अर्पिता खानच्या घरी पोहोचले आहेत. या खास प्रसंगी सलीम खान अगदी सिंपल लूकमध्ये दिसले तर आई सलमा रंगीत सूटमध्ये दिसली.
 
वय किती?
५६ वर्षीय अरबाज दुसऱ्यांदा लग्न करतोय म्हटल्यावर त्याच्या होणाऱ्या पत्नी चर्चा नसती झाली तरच नवल. शूरा खानच्या आणि अरबाज यांच्या वयातही मोठं अंतर आहे. अरबाज ५६ वर्षांचा आहे तर शूरा ४१ वर्षांची आहे. दोघांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे.
अशी सुरू झाली लव्हस्टोरी
खरं तर गेल्या काही वर्षांपासून अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशीपमध्ये होता पण काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्यापही समोर आलं नाहीये. जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात शूराची एन्ट्री झाली. पटना शुक्ला या सिनेमाच्या सेटवर अरबाज आणि शूरा यांची भेट झाली होती. काही महिने डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
खान कुटुंबियांची हजेरी
अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्याला अरबाज खानचा लेक देखील उपस्थित होता तसेच सोहन खान, सलमान खान, बहीण अलविरा खान,अर्पिता खान यांनी उपस्थिती लावली तर अभिनेत्री रविना टंडन, रितेश-जिनिलिया देशमुख यांनी या निकाह सोहळ्याला हजेरी लावत अरबाज आणि शूराला शुभेच्छा दिल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

पुढील लेख
Show comments