Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मेड इन हेवन' सीरिज मधला दलित मराठी मुलीच्या लग्नाचा एपिसोड वादात का?

Webdunia
रविवार, 20 ऑगस्ट 2023 (10:52 IST)
NEERAJ GHAYWAN
ॲमेझॉन प्राईमवरील मेड इन हेवन ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.
दिल्ली आणि एनसीआरमधल्या वेगवेगळ्या हायफाय लग्नांचं प्लॅनिंग करणाऱ्यांची ही गोष्ट आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एका नवीन जोडप्याची लग्नाची गोष्ट दाखवली जाते.
यंदाच्या सीझन-2 च्या 7 भागांपैकी 5व्या एपिसोडची खासकरून चर्चा होताना दिसतेय.
 
नीरज घेयवान यांनी दिग्दर्शित केलेल्या या एपिसोडमध्ये दलित मुलीचं पंजाबी मुलासोबतचं लग्न दाखवण्यात आलं आहे.
 
यात राधिका आपटे ही पल्लवी मेनके नावाच्या एका दलित मुलीची भूमिका साकारताना दिसतेय, जिला तिचं लग्न बौद्ध रीतीरिवाजांप्रमाणे करण्यासाठी तिच्या होऊ घातलेल्या पंजाबी सासरच्यांशी संघर्ष करावा लागतो.
 
कौतुक आणि वादही
या एपिसोडच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक दलित बौद्ध विवाहसोहळा मुख्य प्रवाहात पाहायला मिळत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या भागाचं कौतुक केलं आहे.
मात्र हा एपिसोड एका वादातही सापडला आहे.
 
या भागात पल्लवी मेनके हे पात्र उच्चशिक्षित आहे, ती अमेरिकेत प्राध्यापिका आहे. तिने आपला एक दलित महिला म्हणून जगाला सामोरं जाण्याचा संघर्ष तिने एका पुस्तकातून मांडल्याचंही या भागात सुरुवातीला दाखवलं जातं.
 
दरम्यान, Coming out as a Dalit या पुस्तकाच्या लेखिका यशिका दत्त यांनी राधिका आपटेने साकारलेलं पात्र त्यांच्या जीवनापासून प्रेरित आहे, मात्र त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं क्रेडिट दिलं गेलं नाही, असं म्हटलंय.
एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यशिका लिहितात, “आज नीरज घेवानसारख्या दिग्दर्शकांमुळे अनेक दलित पात्र बॉलिवुडमध्येही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत, जे आधी फक्त दाक्षिणात्य सिनेमांमध्येच दिसायचे. 'मेड इन हेवन'चा पाचवा एपिसोड खरंतर दलित महिलांसाठी एक मोठा विजय आहे, ज्या एका जातीयवादी समाजात राहतात.”
 
“त्यातील एक पात्र तिच्या आजीची गोष्ट सांगतं, जी हाताने शौचालयं साफ करायची. मी माझ्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचं पडद्यावर असं रूपांतरण पाहून भारावून गेले होते. ते माझेच शब्द होते, जे पल्ल्वी मेनके नावाचं पात्र त्या एपिसोडमध्ये बोलत होतं. पण माझं नाव तिथे कुठेही नव्हतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सामूहिक विजयाच्या या क्षणाला एका वेगळ्याच नैराश्याचं गालबोट लागलं.”
 
जे विचार मी आयुष्यभर रुजवले, जे माझं काम आहे, ज्यासाठी माझा आजही प्रचंड तिरस्कार केला जातो, ते माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आले आहेत.”
 
दरम्यान, या एपिसोडचे दिग्दर्शक नीरज घेयवान यांनी यशिका दत्त यांच्या या पोस्टआधीच सोशल मीडियावरील चर्चांची दखल घेत इन्स्टाग्रामवर अनेकांचे आभार मानले होते.
 
त्यात त्यांनी दलित विचारवंत, लेखक सुरज येंगडे आणि सुजाता गिल्डा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी यशिका दत्त यांच्या पुस्तकाचाही उल्लेख करत म्हटलं आहे की, पल्ल्वी मेनकेचं पात्र लिहिताना त्यातून प्रेरणा घेण्यात आली होती.
 
आता यशिका दत्त यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की एपिसोड आणि शो प्रसिद्ध झाल्यानंतर असे सोशल मीडियावर क्रेडिट देण्याऐवजी त्यांना एपिसोडच्या निर्मितीदरम्यानच सांगितलं गेलं पाहिजे होतं आणि एपिसोडमध्येच त्यांना क्रेडिट देणं योग्य ठरलं असतं.
 
मात्र आता ॲमेझॉन प्राईमच्या वतीने 'मेड इन हेवन' या शोचे निर्माते झोया अख्तर, रीमा कागती, अलंकृता श्रीवास्तव आणि नीरज घेयवान यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “सोशल मीडियावरील चर्चा ऐकून आम्हाला दुःख झालं आहे. या शोच्या केंद्रस्थानी वेडिंग प्लॅनर्स आहेत, आणि या एपिसोडचं मुख्य पात्र तिच्या इच्छेनुसार एका दलित बौद्ध लग्नासाठी संघर्ष करताना दाखवलं आहे.
 
"यातलं काहीही यशिका दत्त यांच्या ‘Coming out as a Dalit’ या पुस्तकातून घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे आम्ही दत्त यांचं काम आणि त्यांचे विचार वापरले आहेत, हे दावे फेटाळतो.”
 
मुस्लिम पात्राविषयी वाद
झोया अख्तर आणि रीमा कागतीच्या शो 'मेड इन हेवन 2' मधील दुसरा मोठा वाद हा प्रत्येक वेळी शो आणि चित्रपटांमध्ये मुस्लिम पात्रे योग्य प्रकारे का दाखवली जात नाहीत याबद्दल आहे.
 
अत्याचार होत नसलेली एखादं मुस्लिम स्त्री पात्र कधी दाखवली जाईल का? हा प्रश्न दिया मिर्झाने साकारलेल्या शहनाजच्या पात्राबाबत होता.
 
या एपिसोडमध्ये, शहनाजचा पती लग्नाच्या अनेक वर्षांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि यामुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
यावर उपस्थित होत असलेला प्रश्न पाहता झोया अख्तरने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
 
झोया अख्तरनं तिच्या मागील सर्व चित्रपटांचा संदर्भ देत लिहिलंय की, "लक बाय चान्समधील जफर खान आणि तनवीर. दिल धडकने दो मधील फराह अली, जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील इम्रान आणि लैलाची गोष्ट. गली बॉयची गोष्ट. इन मेड इन हेवनमध्ये सरफराज खान, लीला शिराझी, कबीर, फैजा आणि नवाब यांची गोष्ट...”
 
'संवेदनशील मुद्दे मांडणं महत्त्वाचं'
ही सीरिज पाहिल्यानंतर बीबीसीशी बोलताना जेएनयूचे प्राध्यापक हरीश एस. वानखेडे म्हणाले की, "मला ही वेब सिरीज खूप आवडली. लग्न आणि प्रेमप्रकरणावर आधारित आत्तापर्यंत आलेल्या पारंपरिक चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आहे. या वेब सिरीजमध्ये लेस्बियन मॅरेज, म्हातारपणीचा विवाह किंवा दलित विवाह अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
 
"ज्या विषयांवर फारशी चर्चा होत नाही आणि तुम्हाला दिसेल की या दुसऱ्या सीझनमध्ये हे सर्व विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आले आहेत. हे सर्व विषय अतिशय संवेदनशील असले तरी ते अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहेत. आतापर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर आलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटमध्ये हा अतिशय बौद्धिक आणि प्रगतीशील कंटेट मानला जाऊ शकतो, असं मला वाटतं."
 







Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, पतीसह सोनाक्षी रुग्णालयात पोहोचली

आमिर खानने एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केला, घराची किंमत जाणून घ्या

Asha Bhosle-Sonu Nigam : आशा भोसले यांच्या बायोग्राफी लाँचच्या वेळी सोनू निगमने आशा भोसले यांचे पाय धुतले

Bhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती

52 दरवाजांचे शहर; औरंगाबाद

पुढील लेख
Show comments