Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला वृत्त निवेदिका बनायच होत : सोनिया हुसैन

Webdunia
शनिवार, 3 सप्टेंबर 2016 (11:23 IST)
नशिबाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही अस म्हणतात. बऱ्याचश्या अभिनेत्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवेश हा पसंदीने नव्हे तर अपघाताने झाला; त्यांनी मुद्दाम हे क्षेत्र निवडलेले नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनिया हुसेन ! जिला कोणताही संघर्ष न करता एक मुख्य भूमिका मिळाली. सध्या ही अभिनेत्री ‘मैं हारी पिया’ या मालिकेत परिसाच्या भूमिकेत  दिसते आहे. वास्तविक सोनियाला वृत्त निवेदिका व्हायचे होते.

तिने स्वत:चे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ऑडीशन्सही दिल्या. मात्र, दुर्दैवाने तिला नकार मिळाला. एक वृत्त निवेदिका म्हणून ती स्क्रीनवर पुरेशी प्रगल्भ दिसत नाही, असे ऑडीशन घेणाऱ्यांचे म्हणणे होते.
अशाच एका ऑडीशनमध्ये दिग्दर्शक अली सईद यांनी सोनियाला पाहिले आणि तिला ‘डोन्ट जेलस’ या पहिल्या मालिकेत प्रमुख भूमिकेची ऑफर दिली.वृत्त निवेदिका बनण्याच्या आपल्या इच्छेबद्दल बोलताना सोनिया हुसेन म्हणाली की, “मी विद्यापीठात फिजीऑलॉजीचे शिक्षण घेत होते आणि मला वृत्त निवेदिका बनायचे होते. आपण मीडियाच्या साथीने लोकांचे प्रश्न प्रकाशात आणू शकतो असे माझे आदर्शवादी विचार होते. मात्र त्यांनी जेव्हा माझी ऑडीशन घेतली होती, तेव्हा मी स्क्रीनवर पुरेशी प्रगल्भ दिसत नाही, असे त्यांचे म्हणने होते आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ऑडीशन देण्याचे मला सुचवले.”

मैं हारी पिया ही परिसा (सोनिया हुसेन)ची कथा आहे. ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असते. तिचे लग्न जावर (आगा अली) सोबत झालेले असून तो श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातला असतो. परिसाचे लग्न होते. मात्र आपल्या नवऱ्याचे त्याच्या चुलत बहिणीशीही म्हणजे आईझा (झेबा अली) सोबत लग्न झाले आहे, या वास्तवापासून अनभिज्ञ असते. आइझा ही झावरसोबत राहत नसल्याने त्याला पुन्हा लग्न करण्यास भरीस पाडते. मात्र झावरच्या परिसासोबतच्या पुनर्विवाहाबाबत आईझा नाखूष असते. यामुळे आईझा आणि तिचा भाऊ आपल्या आन्टी सोबत  काहीतरी कारस्थान करून परिसाचे आयुष्यात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. परिसा ही गरीब घरातली असल्याने जावरच्या आईला नापसंत असते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments