Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाची घाई नाही: लुलिया

Webdunia
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि मॉडेल लुलिया वंतूर यांच्या लग्नाची चर्चा सध्या चंदेरी दुनियेत धूमधडाक्यात सुरू आहे. अशा गुलाबी चर्चेला ऊत आला असताना लुलियाने इन्स्टाग्रामवर आपणास लग्नाची अद्याप घाई नसल्याचे म्हटले आहे. यामुळे सलमानच्या चाहत्यांना आपल्या या ‘बॉडीबिल्डर’च्या लग्नाचा बाजा तरी नेमका कधी वाजणार, याची उत्सुकता लागली आहे.
 
याचबरोबर लुलियाने आपले यापूर्वी लग्न झाले नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. लुलियाचे यापूर्वी लग्न झाले असून तिने पतीसोबत घटस्फोट घेतला आहे, अशा वावडय़ाही सध्या उठत आहेत. 
 
दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सलमान खान याने ‘लग्नाचा विषय हा माझ्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे. तो मी सार्वजनिक करणे पसंत करत नाही. लग्नाबाबत योग्य वेळी मी फेसबुक आणि ट्विटर माहिती देईन. माझ्या चाहत्यांना कोणत्यावेळी बातमी द्यायची हे मला माहीत आहे, असे सलमानने स्पष्ट केले होते.
 
यानंतर आता लुलियाने इन्स्टाग्रामवर जे काही सांगितले आहे त्यावरून या दोघांच्या लग्नाची सनई इतक्यात वाजेल याची शक्यता कमी झाली आहे. लुलिया म्हणते की, मला लग्नाचा गाउन परिधान करण्याची इतक्यात घाई नाही. तसेच माझे यापूर्वी लग्न झालेले नाही.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

शबाना आझमी फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या किताबाने सन्मानित

राखी सावंतची प्रकृती बिघडली, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यात लपलेले स्वर्ग,सेथन गाव भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

तारक मेहताला 7 वर्षांनंतर मिळाली नवी 'दयाबेन, पुनरागमन लवकरच होणार

पुढील लेख
Show comments