Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुष्मिताशी भांडण नाही- लारा दत्ता

Webdunia
IFM
IFM
दोन माजी विश्वसुंदर्‍या लारा दत्ता आणि सुश्मिता सेन आगामी 'डू नॉट डिस्टर्ब' या चित्रपटातून एकत्र पडद्यावर येताहेत. पण या दोघींचे अजिबात पटत नाही, असा बॉलीवूडमध्ये प्रवाद आहे, असे असताना या दोघींनी एकत्र काम कसे केले याविषयी अजूनही तर्क लढविले जात आहेत. पण यासंदर्भात लाराला विचारले असता, 'आम्हा दोघींमध्ये कोणतीही भांडणे नाहीत,' हे तिने निःसंदिग्धपणे सांगितले. 'सुष्मिता अतिशय गोड आहे आणि तिच्याशी माझं अजिबात भांडण नाही. अशा अफवा प्रसिद्धीसाठी पकवल्या जातात. अशा चर्चांमध्ये फार तथ्य नसते, असे सांगायलाही ती विसरली नाही.

' आपल्या देशात फक्त आम्हा दोघींनाच मिस युनिव्हर्स होण्याचा मान मिळाला आहे. मग आम्हीच भांडू लागलो तर त्यापेक्षा दुःखाची बाब कोणती असेल? असा सवाल करून सुष्मितासोबत मी पडद्यावर अधिकाधिक काळ दिसावे हीच माझी इच्छा आहे. यापूर्वी आम्ही पडद्यावर एकत्र येऊ शकलो नाही. म्हणूनच आता आलेली संधी खरोखरच चांगली आहे, असे लारा म्हणाली.

कुणाच्या वाट्याला किती वेळाची भूमिका आली यावरून दोघींमध्ये जुंपली असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये पसरली आहे. पण आम्हा दोघींमध्ये सामंजस्य असल्याचे लाराचे म्हणणे आहे. सुष्मितासोबत आणखी पुढेही काम करण्याची तिची इच्छा आहे. डेव्हिड धवन कदाचित हीच करामत पुन्हा घडवून आणतील, असा तिला विश्वासही आहे.

डू नॉट डिस्टर्ब हा डेव्हिड धवन दिग्दर्शित सिनेमा असून यात लारा, सुष्मितासह गोविंदा, रितेश देशमुख, सौहेल खान, रणवीर शौरी आणि राजपाल यादव प्रमुख भूमिकेत आहेत.

यात लारा डॉलीच्या भूमिकेत आहे. डॉली अनेकांच्या स्वप्नातली राणी आहे. पण तिचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि ती तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते.
सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

अल्लू अर्जुनने 'पीडित मुला'साठी शेअर केली भावनिक नोट, व्यक्त केली चिंता

Christmas 2024: गोव्यातील या ठिकाणी ख्रिसमस साजरा करा

एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते

मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो

Show comments