Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुध्दाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील

वेबदुनिया
नेपाळमधील गौतम बुध्दाच्या जन्मस्थानावर पुरातत्त्व खात्याने शोधून काढलेल्या सर्वात जुन्य ा मंदिरामुळे बुध्दाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील असण्याबाबत पुष्टी मिळत आहे. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून प्रसिध्द केलेल्या पवित्र मायादेवी मंदिराच्या परिसरात लुंबिनी येथे खोदकाम करण्यात आले.

या खोदकामात ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील बांबूचा ढाचा आणि विटांमध्ये बांधलेली अनेक मंदिरे सापडली आहेत. ब्रिटनच्या डरहॅम विद्यापीठातील संशोधकांचे पथक रॉबिन कॉनींगहम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून बुध्दाच्या जीवनकाळातील सापडलेला हा पहिलाचा पुरातत्त्व मंदिराचा भाग असल्याचे सांगणत आले. बांबूच्या ढाच्यात मध्यभागी खुली जागा असून राणी मायादेवीने झाडाची फांदी हातात धरून लुंबिनी गार्डनमध्ये आपल्याला जन्म दिल्याची कथा बुध्दाने स्वत:च लिहून ठेवली आहे. भू-पुराणवस्तू संशोधकांनी या भागात पुरातन वृक्षाची मुळे असल्याचे म्हटले आहे.

लुंबिनी परिसरात यापूर्वी झालेल्या खोदकामात ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकापर्यंत अवशेष मिळाले होते. महाराजा अशोकने याच काळात सध्याच्या अफगाणिस्तानपासून बांगलादेशर्पत बौध्द धर्माचा प्रसार केल्याचे मानले जाते. बुध्दांच्या जन्मतारखेबाबत इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात बुध्दांनी त्यांच्या विचारांचा प्रसार केला. वयाच्या 80 व्या वर्षी बुध्दांचा अंत झाल्याचे मानले जाते. आता नव्या संशोधनामुळे लुंबिनीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments