Marathi Biodata Maker

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पुन्हा नोटबंदीचे सावट

Webdunia
मंगळवार, 31 जानेवारी 2017 (11:49 IST)
अर्थसंकल्पाच्या वेळेवरची विरोधकांचा आक्षेप
 
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून लगेच दुसर्‍या दिवशी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत आहे. यावेळी रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नसल्याने एकाच अर्थसंकल्पात दोन्ही प्रस्ताव 
असतील. 
 
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे विरोधकांनी यावेळीही नोटबंदीच्या मुद्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली असून पाच राज्यांच्या निवडणुकांआधी अर्थसंकल्प सादर करण्याबाबतचे आक्षेपही विरोधक नोंदविणार आहेत. 
 
माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी तर अधिवेशनाचे दोन दिवस नोटबंदीवर चर्चा व्हायला हवी अशी मागणी सरकारकडे केली आहे. देशभरातील जनतेवर या नोटबंदीचा काय परिणाम व प्रभाव पडला यावर साधक बाधक चर्चा व्हावी व यासाठी किमान दोन दिवस अधिवेशनात राखून ठेवायला हवेत, असेही येचुरी यांनी सरकारला सुचविले आहे. या शिवाय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर केल्यास तिमाहीच्या अर्थविषयक आकडेवारीचा विचारही यामध्ये करता येणार नसल्याचे येचुरी यांचे म्हणणे आहे. ही माहिती साधारणपणे फ्रेब्रुवारीच्या मध्यकाळात येते असेही ते म्हणाले. 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

राज्य निवडणूक आयोगाने केंद्रनिहाय मतदार यादीची अंतिम मुदत 3 जानेवारी पर्यंत वाढवली

ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी हाती धनुष्यबाण घेत शिंदे गटात प्रवेश केला

LIVE: नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

दिनकर पाटील भाजपमध्ये सामील, मनसे उमेदवारांमध्ये गोंधळ

पुढील लेख
Show comments