Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याअगोदर ह्या गोष्टी लक्षात ठेवा

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2015 (16:44 IST)
नेहमी विद्यार्थी अॅडमिशन घेण्याअगोदर पूर्ण माहीत काढत नाही आणि नंतर पश्चात्ताप करतात. 

प्रत्येक विद्यार्थीच्या जीवनात हायर सेकेंडरी उत्तीर्ण केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो की त्याला कुठल्या कॉलेजमध्ये  ऍडमिशन घ्यायला पाहिजे.  
 
नेहमी मुलांना प्रलोभन देणार्‍या जाहिरात, ऐकलेल्या गोष्टी आणि दुसर्‍यांचे बघून मुलं आणि त्यांचे पालक चुकीच्या कॉलेजची निवड करतात, जे विद्यार्थीच्या करियरसाठी फारच वाईट सिद्ध होते.  
 
एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊन ही चेकलिस्ट तयार करण्यात आली.

संपूर्ण रिसर्च करा
 
भावी स्टूडेंट होण्याच्या नात्याने तुमची सर्वात मोठी चूक म्हणजे आवेदन करण्या अगोदर पर्याप्त शोध घेतलेला नसवा.  
 
पण हे कसे समजेल की तुमची निवड योग्य आहे की नाही.  
 
आलोक जोशीचे उदाहरण घ्यायचे म्हणजे, त्याने वर्ष 2011मध्ये कानपूरच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएत प्रवेश फक्त यासाठी घेतला होता की त्याला असे समजले होते की येथे प्लेसमेंट चांगले होतात.  
 
आलोकच्या ओळखीच्या बर्‍याच विद्यार्थ्यांनी त्याला बघून तेथे प्रवेश घेतला, नुकतेच यूजीसीने या युनिव्हर्सिटीला बोगस घोषित केले, आता या विद्यार्थ्यांचे भविष्य मधल्या मध्ये अडकलेले आहेत.  
 
याच प्रकारे, कुठल्याही संस्थेची सध्याची रँकिंग काय आहे, हे जाणून घेणे फारच जरूरी आहे पण फक्त या आधारावर तुम्ही तेथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेऊ शकत नाही.  
 
एक्सपर्ट हे ही म्हणतात की विद्यार्थी आणि पालकांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की कॉलेजचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत जास्त लक्ष्य विद्यार्थीची गरज, त्यांची योग्यता आणि कमतरतेवर दिले पाहिजे.  

काय आहे ‘छात्र केंद्रित’ प्रक्रिया?

प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याचे विचार, प्राथमिकता आणि व्यक्तित्व सर्व काही वेगळे असते.
  
सर्वात आधी विद्यार्थ्याला आपले लक्ष्य काय आहे, निवडलेल्या कॉलेजमध्ये कुठले कोर्स सुरू आहे? आणि त्या कोर्सेसच्या माध्यमाने तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण करू शकता का.  
 
कॉलेजमध्ये स्टडी मटेरियल, हॉस्टल, सुरक्षा, खानपान, ट्रांसपोर्टेशन आणि रिसर्च वगैरहची सुविधा कशी आहे, हे बघणे फारच गरजेचे आहे. 

कॉलेजची निवड करताना या गोष्टींकडे लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे :

पूर्णपणे या गोष्टीचा शोध घ्या की ज्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही अॅडमिशन घेत आहे ती मान्यताप्राप्त आहे की नाही.  
 
कॉलेजमध्ये ऍडमिशनचे कट ऑफ परसेंटाइल.
 
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल कसा आहे.  
 
कॉलेजच्या वेबसाइटशिवाय त्याची सोशल मीडिया प्रजेंसवर लक्ष्य देणेही गरजेचे आहे, ज्याने तुम्हाला हे लक्षात येईल की तेथील विद्यार्थी कुठल्या बाबींमुळे खूश किंवा नाखूश आहे.  
 
राहण्याची व्यवस्था कशी आहे - काय हे मुख्य रुपेण आवासीय किंवा नियमित येणार्‍या जाणार्‍यांचे कँपस आहे. 

फॅकल्टीची विस्तृत तपास करावी, योग्य शिक्षक असणे फारच गरजेचे आहे.   
 
उपस्थित छात्र आणि नुकतेच ग्रॅज्युएट झालेल्या लोकांशी संवाद साधणे फारच गरजेचे आहे. 
 
मागील पाच वर्षांचा प्लेसमेंट रेकॉर्ड आणि इंटर्नशिप देणार्‍या कंपन्यांच्या लिस्टची माहिती काढून घ्या.  
 
कँप्सबद्दल माहिती काढून घ्या, शक्य असल्यास स्वत:जाऊन किंवा वर्च्युअल टूरच्या मदतीने माहिती काढा.  

पालकांसाठी लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी  
 
1. संबंधित कॉलेजमध्ये दिल्या जाणार्‍या स्कॉलरशिपबद्दल माहिती काढा. 
 
2. कॉलेजमध्ये अभ्यासासाठी मिळणार्‍या एज्युकेशन लोनची माहिती काढा. लक्षात ठेवाकी एज्युकेशन लोन फक्त त्या कॉलेजांनाच दिले जातात जे मान्यता प्राप्त असतात किंवा त्यांची प्रतिष्ठा असते.  
 
3. जर कॉलेज शहराच्या बाहेर असेल तर शहराबद्दलची माहिती काढा आणि यात्रे संबंधी रिझर्वेशन करा. 

सावधान! 
नेहमी मुलं एमबीए, बीई सारख्या डिग्री मिळवण्यासाठी जास्त चाचणी न करता कुठल्याही अशा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात ज्यांच्या डिग्रीला मान्यता नासते.  
 
अशा युनिव्हर्सिटीचे शिकार लहान खेड्यातील मुलं जास्त होतात, जे दूसर्‍या राज्यांच्या अशा युनिव्हर्सिटीत अॅडमिशन घेऊन घेतात ज्यांना मान्यता नसते, असे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या गोष्टीची जाणीव होते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.  

मागील 10 वर्षांमध्ये किमान 90 हजार विद्यार्थी बोगस युनिव्हर्सिटीचे शिकार झाले आहेत, महाविद्यालय अनुदान आयोग अर्थात यूजीसीचा प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांचा अशा बोगस युनिव्हर्सिटीशी बचाव केला पाहिजे. यूजीसीने या बोगस युनिव्हर्सिटीची यादी आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.  
 
आमच्या देशात एकूण 712 अशा युनिव्हर्सिटीज आहे ज्यांना यूजीसीची मान्यता प्राप्त आहे, यात 330 स्टेट युनिव्हर्सिटी आहे, तसेच 128 युनिव्हर्सिटीनं डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटीप्रमाणे 46 युनिव्हर्सिटी आहेत. प्रायवेट युनिव्हर्सिटीची संख्या 208 आहे. या सर्वांची माहिती यूजीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध करवण्यात आली आहे.   
 
तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा पूर्णपणे तपास करा आणि विचार करा, कारण एकदा प्रवेश घेतल्यानंतर वेळ आणि पैशांची बरबादी तुम्ही रोखू शकत नाही.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Show comments