rashifal-2026

डाएटिशियन- एक करीयर

Webdunia
NDND
' डाएटिक्स' अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. हल्ली डाएटविषयीची जागरूकता भयंकर वाढली आहे. जनसेवा म्हणून डाएटीशियन म्हणून करीयर करण्याची चांगली संधी युवापिढीसमोर आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डाएटिंगवर लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. डाएटिशियन क्लबचे सदस्य होत आहेत.

एक उत्तम डायटीशियन होण्यासाठी पदवीधर किंवा पदव्यूत्तर परीक्षा, गृहशास्त्र, न्यूट्रिशन, खाद्यशास्त्र पद्धती आदी विषय घेऊन उत्तीर्ण केली पाहिजे.

  'डाएटिक्स' अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. हल्ली डाएटविषयीची जागरूकता भयंकर वाढली आहे. जनसेवा म्हणून डाएटीशियन म्हणून करीयर करण्याची चांगली संधी युवापिढीसमोर आहे.      
डाएटिशियन एक मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याने येणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्याची जबाबदारी त्याच्यावर येत असते. डाएटिशियन हा लोकांच्या खाण्यापिण्यापासून तर वाईट सवयींवर देखील लक्ष ठेवतो आणि नियमित व्यायाम, प्राणायाम व दररोजच्या आहाराचे प्रमाण ठरवून देत असतो. मोठमोठ्या दवाखान्यामध्येही रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका डाएटिशियनची नेमणूक केलेली असते. खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्या देखील नवीन ब्रॅंड तयार करण्याआधी ज्येष्ठ डाएटिशियनचे मार्गदर्शन घेत असतात.

उमेदवाराला डाएटेटिक्स शास्त्रात पदवी घ्यायची झाली तर त्यासाठी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र व गृह शास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उमेदवाराला बीएस्सीची पदवी देण्यात येते. त्यासोबत न्यूट्रिशन व डायटेटिक्स या विषयामध्येही बीएस्सी हा पदवी कोर्स करता येतो.

पदवीनंतर दोन वर्षांचा पदव्यूत्तर कोर्स आहे. तसेच एक वर्षांचा डिप्लोमा कोर्स देखील उपलब्ध आहे. जे उमेदवार गृहशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरींग, माइक्रोबायोलॉजी, बायोकेमेस्ट्री आदी विषयात पदवीप्राप्त आहेत. ते डाएटिशियनच्या पदवी व डिप्लोमासाठी पात्र आहेत.

एक वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये डाएटिशियन म्हणून तीन महिने प्रशिक्षण घेणे अनिवार्य आह े.

हैद्राबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ही केंद्र सरकारची मान्यताप्राप्त संस्था कार्यरत आहे. सुरवातीला शिकाऊ डाएटीशियनला ट्रेनिंगच्या दरम्यान 5,000 रुपयापर्यंत मानधन दिले जाते. अनुभव घेतल्यानंतर उमेदवार स्वत: प्रॅक्टि स सुरू करू शकतो.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

नैसर्गिकरित्या कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करा

कविश्रेष्ठ आणि थोर साहित्यकार ग. दि. माडगूळकर यांची माहिती

Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

झेंडूचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

Show comments