Marathi Biodata Maker

अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले! प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला लागणार पहिली गुणवत्ता यादी

वेबदुनिया न्यूज टीम
शनिवार, 9 मे 2026 (14:32 IST)
महाराष्ट्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे (FYJC Admission) सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेशाच्या फेऱ्यांचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
 
महत्त्वाचे टप्पे आणि वेळापत्रक:
शून्य फेरी (Zero Round): ८ ते २० मे दरम्यान ही फेरी सुरू असून, यामध्ये विद्यार्थी अर्जाचा भाग-१ भरू शकतात.
पसंतीक्रम नोंदवणे: ११ मे ते १३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ (महाविद्यालयांचे पसंतीक्रम) भरता येईल. यात किमान १ ते कमाल १० महाविद्यालये निवडता येतील.
तात्पुरती गुणवत्ता यादी: १४ ते १५ मे रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावर हरकती नोंदवण्यासाठी १६ मे हा दिवस दिला आहे.
पहिली नियमित फेरी: २१ मे पासून खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल.
२१ ते २२ मे: अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची शेवटची संधी (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत).
२३ ते २६ मे: महाविद्यालयांकडून प्रवेश जाहीर करण्याची प्रक्रिया पार पडेल.
२६ ते २८ मे: ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
दुसरी फेरी: २९ मे रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती दिली जाईल आणि ३० मे रोजी त्याचे वेळापत्रक जाहीर होईल.
 
१. प्रचंड नोंदणी: आतापर्यंत सुमारे ७.७४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
२. केवळ ऑनलाइन प्रवेश: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे की, अकरावीचे सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन पद्धतीनेच होतील.
३. कोटा प्रवेश: व्यवस्थापन, अल्पसंख्यांक आणि संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांची माहितीही विद्यार्थ्यांना याच काळात भरायची आहे.
 
विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळेत आपले अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

सकाळी उठताच पाणी पिणाऱ्यांनी आधी हे वाचा

चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारा दक्षिण भारतीय पदार्थ व्हेज उपमा

मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, हे उपाय करा

रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी १६४४ पदांची भरती, निवड परीक्षेविना थेट

सावळ्या त्वचेला सुंदर बनवण्यासाठी या टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments