Festival Posters

Career Development Tips : चांगल्या कॅरिअर साठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
रविवार, 7 मे 2023 (15:40 IST)
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हावं असं वाटते, या साठी प्रत्येक जण चांगलं करिअर निवडतं, उत्तम करिअर निवडण्यासाठी काही टिप्स असतात ज्यांना अवलंबवून यशाच्या मार्गावर वाटचाल करू शकतात.तुम्हाला उत्तम करिअर करायचे असेल, तर पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त तुम्हाला इतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून कोणीही चांगले जीवन जगू शकत नाही,
 
पुस्तकी ज्ञानाने नोकरी किंवा व्यासपीठ मिळू शकते, पण त्या व्यासपीठावर अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल, पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्या.अशा काही गोष्टी  ज्या तुम्हाला चांगले करिअर घडवण्यात खूप मदत करतात.जाणून घेऊया
 
उत्तम करिअर घडवण्यासाठी या  गोष्टी अवलंबवा-
 
1 आत्मविश्वास सर्वात महत्वाचा आहे-
 जीवनाची लढाई जिंकण्यासाठी आत्मविश्वास असला पाहिजे. तुमच्यात क्षमता असेल पण आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कितीही मोठी पदवी मिळवली तरी तुम्ही काहीही चांगलं करू शकत नाही. अभ्यासासोबतच अशा उपक्रमांमध्ये भाग घेत राहा ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
 
2स्वतःशी प्रामाणिक रहा-
 कोणतेही खोटे बोलणे फार काळ टिकत नाही, म्हणून नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा आणि तुमची खरी प्रतिमा लोकांसमोर मांडा, खोटी नाही. याशिवाय तुमच्या कामाप्रती नेहमी प्रामाणिक राहा, तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊ शकतो.
 
3 स्वतःची प्रतिभा शोधा -
पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर उत्तम करिअर किंवा नोकरीची अपेक्षा करता येईल, अशी आजची वेळ नाही. आता काळ बदलला आहे, आता पुस्तकी किडा बनून किंवा पदव्यांचा ढीग करून करिअर घडवता येत नाही. जर तुम्हाला उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि तुमच्यातील प्रतिभा शोधण्याची गरज आहे. तुमच्यात लपलेले टॅलेंट सापडले की तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही त्या क्षेत्रातील इतर लोकांपेक्षा चांगले स्थान मिळवू शकता.
 
4 संपर्क वाढवा-
 तुमचा जितका जास्त लोकांशी संपर्क असेल तितके तुमचे जीवन सोपे होईल. हीच गोष्ट करिअर घडवण्यासाठी लागू होते. तुमच्या सर्वोत्तम संपर्कांमुळे तुम्हाला करिअरची चांगली संधी मिळू शकते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना भेटत राहा आणि त्यांना तुमची माहिती देत ​​रहा आणि त्यांची माहिती घेत रहा. जेव्हा करिअर किंवा नोकरीमध्ये चढ-उतार असतात तेव्हा तुमचे हे संपर्क कामी येतात. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात रहा.
 
5  कुटुंब देखील सर्वात महत्वाचे आहे- 
करिअरच्या उभारणीमुळे अनेकदा लोक घरापासून आणि कुटुंबापासून दूर जातात.. करिअरमधील चढ-उतार आणि तणावाच्या काळात तुमचे कुटुंब तुमच्या मदतीला येते. म्हणूनच तुमच्या कुटुंबाशी जोडलेले राहा आणि तुमच्या नात्यात कधीही अंतर येऊ देऊ नका. कुटुंबासोबत राहिल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या करिअरकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित करता.
 
6 टेक्नो फ्रेंडली व्हा- 
सर्वोत्तम करिअरसाठी टेक्नो फ्रेंडली असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञान नाकारता येत नाही. तुमच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान ठेवा. यासोबतच नवनवीन तंत्रज्ञानही शिकत राहिले.
 
 
7 स्वतःला अपडेट करत रहा- 
आजकाल मोबाईल अॅप्स सुद्धा स्वतःला अपडेट करायला सांगतात त्यामुळे काळानुरूप तुम्ही स्वतःला बदलत राहणं गरजेचं आहे. करिअरच्या बाजारपेठेत आपले मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, स्वतःला अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात नाश्त्यात हे पदार्थ खाणे टाळा; सर्दी आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो

Double Date मुली डबल डेट का पसंत करतात? तुम्हाला डबल डेटिंगबद्दल माहिती आहे का?

Proper method of roasting peanuts तेल किंवा तूप न घालता शेंगदाणे भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

हिवाळ्यात बनवा पौष्टिक असे Fish kebab

पुढील लेख
Show comments