Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Career In Cinematography: सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:11 IST)
Career In Cinematography:  कॅमेराची आवड आणि कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असल्यास सिनेमॅटोग्राफी मध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहे. कोणत्याही चित्रपटाचे यश हे त्या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीवर सर्वाधिक अवलंबून असते. सिनेमॅटोग्राफीमध्ये स्क्रीनवरील सर्व व्हिज्युअल इफेक्ट्स, कॅमेरा मूव्हमेंट, लाइटिंग, कॅमेरा अँगल, लेन्स, फिल्टर, फोकस, रंग, फील्ड इंटेन्सिटी, एक्सपोजर इत्यादींचा समावेश होतो. एक सिनेमॅटोग्राफर म्हणून, तुम्हाला स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स, फोटोग्राफिक इमेजेस, तसेच क्रिएटिव्ह क्रू मेंबर्स, डायरेक्टर्स आणि प्रोडक्शन टीम्ससोबत समन्वय राखण्यासाठी काम करणाऱ्या टीमचे नेतृत्व करावा लागतो.या क्षेत्रातील स्पेशलायझेशनसाठी महाविद्यालयांमध्ये पदवी, पदविका पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. 
 
पात्रता -
यामध्ये करिअर करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही प्रवाहात पदवीधर असणे आवश्यक आहे. तथापि काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी किमान पात्रता 10+2 आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त उमेदवाराकडे कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे.
 
अभ्यासक्रम कुठून करावा-
भारतातील सर्वोत्कृष्ट 9 महाविद्यालये जी त्यांच्या विद्यार्थ्यांना सिनेमॅटोग्राफीचे उच्च श्रेणीचे शिक्षण देतात-
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन (FTII), पुणे
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल (WWI), मुंबई
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), कोलकाता
एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (AAFT), नोएडा
बिजू पटनायक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, ओडिशा
सरकारी चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, बंगलोर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID), अहमदाबाद
एल व्ही प्रसाद फिल्म इन्स्टिट्यूट, चेन्नई आणि त्रिवेंद्रम
केआर नारायणन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअल सायन्स अँड आर्ट्स (KRNNIVSA)
 
करिअर व्याप्ती -
 
चित्रपटसृष्टीतील मागणीही वाढत आहे. आता चित्रपटांव्यतिरिक्त, सिनेमॅटोग्राफर वेब सीरिज, शॉर्ट फिल्म्स, टीव्ही शो, फिल्म क्रिएशन युनिट्स, स्टुडिओ आणि व्हिडिओ व्यवसायातून चांगली कमाई करू शकतात.
डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी (DOP)
व्हिडिओ एडिटर 
सिनेमॅटोग्राफर
कॅमेरामन
व्हिडिओग्राफर
कॅमेरा प्रोडक्शन असिस्टंट 
कॅमेरा ऑपरेटर
मोशन कंट्रोल ऑपरेटर
कॅमेरा असिस्टंट 
फ्रीलांसर म्हणून काम करू शकता.
 
पगार- 
या क्षेत्रात तुमची सरासरी कमाई किती असेल हे तुमच्या जॉब प्रोफाइल, काम, अनुभव, ज्ञान, कौशल्ये, स्पेशलायझेशन आणि उद्योग यावर अवलंबून आहे.
तथापि, भारतातील सिनेमॅटोग्राफरचे सरासरी वार्षिक वेतन सुमारे 94,000 ते 1,00,000 रुपये आहे. जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर हा पगार वार्षिक5 लाखांवरून 6  लाखांपर्यंत वाढू शकतो.
 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments