Dharma Sangrah

Career Tips:बारावीनंतर योग्य कोर्स कसा निवडावा? या 6 टिप्स मदत करतील

Webdunia
शुक्रवार, 22 जुलै 2022 (13:13 IST)
How To Choose Best Career After 12th: 12 वी उत्तीर्ण झाल्यावर करिअरची निवड करण्याचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. करिअरची निवड कशी करावी जेणे करून त्यांना भविष्यात काही त्रास होणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही योग्य करिअर पर्याय निवडू शकता.
 
1 प्रथम स्वतःचे मूल्यांकन करा,
परीक्षेत गुण मिळवून विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यांकन केले जाते, बहुतेक विद्यार्थी नंतर त्याच अभ्यासक्रमात प्रवेश घेतात ज्यामध्ये त्यांना चांगले गुण मिळतात, आपण स्वतःचे चांगले मूल्यांकन करू शकता. आपल्याला कोणता विषय आवडतो याचा विचार करा. हे तुम्हाला तुमच्या कौशल्य आणि आवडीशी जुळणाऱ्या करिअरच्या कल्पना निवडण्यात मदत करेल. तुमच्या आवडीची सर्व क्षेत्रे त्याच्या गुणवत्तेसह कागदावर लिहा, त्यानंतर करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी कोणता कोर्स सर्वोत्तम असेल ते ठरवा.
 
2 आवडत्या विषयांची यादी बनवा-
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्या आवडत्या विषयांची आणि क्षेत्रांची यादी तयार करा. हे तुम्हाला करिअरचे चांगले पर्याय पाहण्यास मदत करेल. ही यादी तुम्हाला आवड नसलेली गोष्ट काढून टाकण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. या यादीच्या आधारे तुमची करिअर निवड करण्यासाठी  उपयुक्त ठरू शकते. असे 10-15 करिअर पर्यायाची नोंद करा जे भविष्यात कामी येईल.
 
3 योग्य कोर्स निवडा-
प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विषयात तज्ञ आहे, तुम्ही ज्या विषयात तुम्ही स्वतःला तज्ञ समजता त्यानुसार कोर्स देखील निवडा. आजच्या तारखेत असे अनेक अभ्यासक्रम आहेत जे तुम्ही तुमच्या करिअरनुसार जुळवून घेऊ शकता. या साठी तुम्ही महागड्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे नाही. अभ्यासासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही संस्थेतून पदवी अभ्यासक्रम, डिप्लोमा कोर्स, वीकेंड कोर्स, डिस्टन्स लर्निंग कोर्स करू शकता. प्रवेश घेण्यापूर्वी तिथे शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांशी बोलून सर्व माहिती मिळवून घेऊ शकता. अभ्यासक्रमाची व्याप्ती काय आहे, ते आधी शिकणारे विद्यार्थीच सांगू शकतात, त्यानुसार निर्णय घेऊ शकता.
 
4 उत्तम करिअर वाढीची क्षमता पहा
कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, त्या कोर्समध्ये करिअरची वाढ कशी आहे हे लक्षात घ्या . तुम्ही ऑफबीट कोर्स निवडत असाल, तर भविष्यात त्याचा विस्तार आणि वाढीच्या शक्यतांचा नीट विचार करा, तसेच त्या क्षेत्रात नोकरी मिळण्याच्या किती शक्यता आहेत त्याचा विचार करा. त्यासोबतच त्या-त्या अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेण्याची शक्यता आहे का, हेही बघा.
 
5 दबावाखाली अभ्यासक्रम निवडू नका
प्रवेशाच्या वेळी पालकांच्या दबावाखाली कोणताही अभ्यासक्रम किंवा संस्था निवडू नका, यामुळे तुमचे भविष्य धोक्यात येऊ शकते. तुम्ही ज्या अभ्यासक्रमात किंवा संस्थेत प्रवेश घेत आहात त्या संस्थेची मान्यता, विद्याशाखा आणि प्लेसमेंट कामगिरीबद्दल माहिती मिळवण्याची खात्री करा. तुमची आवड आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तुम्ही कोर्स निवडल्यास तुमचे भविष्य करिअरच्या दृष्टीने खूप उज्वल असेल आणि वाढीच्या अनेक संधी असतील यावर विश्वास ठेवा.
 
6 निवडलेल्या करिअर पर्यायांचे परीक्षण करा
किमान पात्रता, फायदे आणि तोटे, पगार आणि वाढीच्या संधी यासारख्या विविध पॅरामीटर्सवर निवडलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमाचे आणि करिअरच्या पर्यायांचे विश्लेषण करा. तसेच, त्या करिअरमध्ये आधीच कार्यरत असलेल्या लोकांसोबत थोडा वेळ घालवा, यामुळे तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सीए व्हायचे असेल तर एखाद्या सीएला भेटा आणि त्याच्याशी त्याच्या कामाबद्दल आणि करिअरच्या वाढीबद्दल माहिती करून घ्या.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उर्जेची पातळी राखण्यासाठी आणि अशक्तपणा टाळण्यासाठी सर्वांसाठी फायदेशीर दही सॅलड रेसिपी

सकाळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने हे फायदे मिळतात

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती

प्रत्येक मुलीने हे 7 मेकअप टूल्स आपल्याकडे ठेवावे

हिवाळ्यात पालक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पुढील लेख
Show comments