Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CBSE Class 10 Maths Term 2 Exam Tips:गणिताच्या पेपरमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी या 7 टिप्स जाणून घ्या

Webdunia
रविवार, 24 एप्रिल 2022 (14:18 IST)
CBSE इयत्ता 10 ची गणित टर्म 2 ची परीक्षा आता लवकरच होणार यावेळी परीक्षेत केवळ व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे वस्तुनिष्ठ पॅटर्नमधून व्यक्तिनिष्ठ पॅटर्नमध्ये हा बदल विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळविण्याच्या मार्गात काही अडचण निर्माण करू शकतो. या अडचणीवर मात करण्यासाठी आणि परीक्षेची तयारी सोपी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत. तज्ञांनी सुचवलेल्या या सोप्या आणि अतिशय प्रभावी टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या CBSE इयत्ता 10 च्या गणित टर्म 2 च्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवू शकाल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 नवीनतम अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घ्या -
तुमच्या गणिताच्या अभ्यासक्रमाची उजळणी करताना, टर्म 2 परीक्षेसाठी गणिताच्या सेटच्या सर्व विषयांसह नवीनतम पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम पहा. CBSE मार्किंग स्कीमनुसार उजळणी केल्याने तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे याची माहिती मिळेल. 
 
2 NCERT चे सर्व सोडवलेले आणि न सोडवलेले प्रश्न सोडवा-
फक्त नियमित सरावानेच तुम्ही गणितात पारंगत होऊ शकता. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना NCERT पुस्तकांतील प्रश्नांचा सराव करण्याचा सल्ला देतात. एनसीईआरटीमध्ये दिलेले प्रश्न सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाचे असतात. परीक्षेत विचारले जाणारे सर्व प्रकारचे प्रश्न सहज सोडवण्यासाठी NCERT प्रश्न वारंवार सोडवा. तुम्ही मध्यम प्रकारच्या प्रश्नांपासून सुरुवात करून नंतर जास्त अवघड असलेले प्रश्न सोडवा. 
 
3. प्रश्नांची उत्तरे देण्याची स्टेप वाईज पद्धत समजून घ्या -
CBSE टर्म 2 परीक्षा 2022 मध्ये व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारले जातील हे  माहीत असू द्या,या साठी तुम्ही प्रश्नांची उत्तरे देण्याची चरणवार पद्धत समजून घेणे फार महत्वाचे आहे. गणितात, प्रत्येक योग्य स्टेप्ससाठी, विशिष्ट संख्येचे गुण दिले जातात. अशा प्रकारे, योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या तुम्ही अचूकपणे लिहिल्यास, तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. उत्तर लेखनाची ही चरणवार पद्धत समजून घेण्यासाठी, व्यक्तिनिष्ठ प्रश्नांचा सराव करा आणि CBSE नमुना पेपरसह जारी केलेल्या मार्किंग स्कीमची मदत घ्या.  
 
4. केस स्टडी प्रश्नांचा सराव करा -
तुम्हाला CBSE इयत्ता 10 ची गणित टर्म 2 परीक्षा 2022 मध्ये केस स्टडी आधारित प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग तुम्हाला अवगत असावा. सर्व प्रकरणांमधील केस स्टडी प्रश्नांचा सराव करा परंतु अंकगणित प्रगती(Arithmetic Progression), पृष्ठभाग क्षेत्रे (Surface Areas),आणि खंड(Volumes) आणि त्रिकोणमितीचे काही अनुप्रयोग (Some applications of Trigonometry)यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.
 
5. CBSE सॅम्पल पेपर्स आवर्जून सोडवा-
 CBSE नमुना पेपर हे स्वयं-मूल्यांकन(सेल्फ इव्हॉल्युशन) आणि प्रश्नांची अडचण पातळी समजून घेण्यासाठी सर्वोत्तम आहेत कारण बोर्ड परीक्षांमधील प्रश्नपत्रिकेचा सॅम्पल  पेपरवरच आधारित असतो. नमुना पेपर 2 तासात सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दिवशी वाटेल आणि परीक्षेच्या पूर्वी कमतरता दूर करू शकाल. 
 
6. सर्व महत्त्वाची सूत्रे एका पानावर टिपून घ्या आणि त्यांचा नियमित अभ्यास करा- 
गणितात तुम्ही योग्य सूत्र, प्रमेय किंवा संकल्पना(कॉन्सेप्ट)वापरल्यासच तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. काहीवेळा तुम्हाला परीक्षेदरम्यान सूत्रे लक्षात ठेवणे कठीण जाऊ शकते. म्हणूनच तुम्ही सर्व सूत्रे आणि प्रमेयांची अध्यायानुसार यादी बनवून राखणे फार महत्वाचे आहे जेणेकरून तुम्ही त्या सर्वांची पुन्हा पुन्हा उजळणी करू शकाल.आणि असं केल्याने गणिताचे प्रश्न सोडवण्यास सोपे जाईल.
 
7. मित्रांसह गणिताचा सराव करा-
गणिताचा अभ्यास करण्याचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. खरं तर, गणिताच्या प्रश्नांचा समूहांमध्ये सराव केल्याने सर्व मित्रांना एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आणि विशिष्ट विषयांमध्ये एकमेकांना मदत करण्याची संधी मिळते. याशिवाय, मित्रांसोबत अभ्यास केल्याने तुमचा उत्साह वाढतो जो तुम्हाला इतरांपेक्षा चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर गणित विषयात चांगली कामगिरी करण्याचा सकारात्मक दबाव निर्माण होतो. प्रश्नांचा अध्यायानुसार सराव करा आणि चुका तपासण्यासाठी तुमच्या मित्रांसह क्रॉस चेक करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

पुढील लेख
Show comments