Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

दिवाणी न्यायाधीश  न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (22:18 IST)
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक २४ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तद्नंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

प्रवास करताना मुलांची विशेष काळजी घ्या, अन्यथा पालकांना अडचणी येऊ शकतात

लघू कथा : जंगलाचा राजा

Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

Fasting Recipe मखाना पराठा चैत्र नवरात्रीत नक्की ट्राय करा

पुढील लेख
Show comments