Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीक्यू (Culture quotient) विषयी जाणून घ्या

सीक्यू (Culture quotient) विषयी जाणून घ्या
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (12:15 IST)
हल्ली नोकरभरती करण्याआधी उमेदवारांची नीट पडताळणी केली जाते. आज बर्याच कंपन्या, बँका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आहेत. विविध देशांमध्ये त्यांच्या शाखा असतात. म्हणूनच उमेदवारांची भरती करून घेताना त्यांचा सीव्ही, पार्श्वभूमी यांची पडताळणी केली जाते. तसंच आता त्यांचा सीक्यूही तपासला जात आहे. सीक्यू म्हणजे काय तर ‘कल्चरल कोशंट'. कंपनीतर्फे परदेशात पाठवल्या जाणार्या उमेदवारांचा सीक्यूही तपासला जातो. परदेशात गेल्यावर आपल्याला तिथल्या लोकांची भाषा शिकून घ्यावी लागते. त्यांच्या परंपरा जाणून घ्याव्या लागतात. शिष्टाचार शिकून घ्यावे लागतात. मग आपण त्याच पद्धतीने वागतो. परदेशातल्या लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. याच प्रयत्नांना सीक्यू असं म्हटलं जातं.
 
उमेदवाराचा सीक्यू तपासण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. काही गोष्टींची पडताळणी केली जाते. परक्या देशातगेल्यानंतर तिथल्या संस्कृतीची ओळख करून घेण्याची, देशाबद्दल जाणून घेण्याची उमेदवाराची इच्छा जाणून घेतली जाते. याला सीक्यू ड्राईव्ह असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे सीक्यू ज्ञान. इतरांच्या आणि आपल्या चाली-रितींमधला फरक समजून घेण्याची क्षमता यात तपासली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीशी जवळीक साधण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे जाणून घेतलं जातं.
 
नोकरीसाठी परदेशात जायचं असेल तर सीक्यू चांगला असणं गरजेचं आहे. सीक्यूमध्ये सुधारणा करण्यासाठी काही अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. योग्य प्र्रशिक्षण घेऊन तुम्ही सीक्यू सुधारू शकता आणि परदेशात चांगली नोकरी मिळवू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्य टिप्स : यशस्वी होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा