Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करूणेतून उपहासाचा जन्म- अशोक चक्रधर

-भीका शर्मा व गायत्री शर्मा

Webdunia
जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. दु:ख, निराशा, वैफल्य आदी अनेक कारणामुळे चेहर्‍यावरील हास्य हरवलंय. हसणेही कठीण झाले आहे. आपल्या तणावग्रस्त चेहर्‍यावर हास्य फुलविणारे हिंदी हास्य कवी अशोक चक्रधर हे मराठी रसिकांनाही आता चांगलेच माहिती झाले आहेत. हास्य कविता रसिकांना भरपूर हसवितातही. पण त्यांच्या भावगर्भ अशा उपहास कवितांनी रसिकांना अंतर्मुखही व्हायला होते. अनेक हिंदी हास्य कवी संमेलनांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात नित्य येत असतात. त्यांच्या या हास्यप्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा....

प्रश्न : बालपणाविषयी काही सांगा?
उत्तर : उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे माझा जन्म झाला. खुर्जाहून शिक्षणासाठी अलाहाबाद येथे यावे लागत होते. त्यामुळे संपूर्ण 'ब्रज' क्षेत्रात माझे बालपण अतिशय मजेत गेले.

प्रश्न : आपला कल गद्यापेक्षा पद्याकडे अधिक का ?
उत्तर : मला गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या लिखाणाची आवड आहे. म‍ी आतापर्यंत अनेक कथाही लिहिल्या आहेत. काही इतर पुस्तकेही लिहिली आहेत. पण हे खरे की माझ्या कवितांची संख्या जास्त आहे. माझे वडील कवी होते. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून मला हा वारसा लाभला आहे. स्वाभाविकच कविता सहजपणे सुचत असावी.

प्रश्न : कवीला व्याकरणही यायला हवे काय?
उत्तर : माझ्या मते व्याकरणापेक्षा कवीला अंत:करण असणे गरजेचे आहे. आपण कोणाच्या हृदयात डोकावून पाहिलेच नाही, तर कविता सुचेल कशी? दुसर्‍याच्या ह्रदयात डोकावल्याने आपल्या ह्रदयात तरंग उमटले नाही, तर आपण साहित्य निर्मिती करूच शकत नाही. व्याकरण तर त्याच्या पुढची पायरी आहे.

प्रश्न : आपली कविता सुचण्याची पार्श्वभूमी काय आहे?
उत्तर : जी गोष्ट मनाला लागते. त्यातून कविता जन्म घेत असते. मला माझ्या आईवर होणार्‍या अत्याचारामुळे कविता लिहिण्‍याची प्रेरणा मिळाली. एकत्र कुटुंबात माझ्या आईला सहन कराव्या लागणार्‍या प्रत्येक घटनेने मला कविता लिहिण्यास प्रेरित केले. एकदा आमच्या गावात भूकंप झाला. त्यात आमचे घर जमीनदोस्त झाले. माझे मोठे काका आमच्या पडलेल्या घराची दशा गंमतीने पाहत होते. त्या परिस्थितीवर माझी पहिली कविता जन्माला आली.

प्रश्न : आपल्या मते हसणे म्हणजे काय? हास्य व व्यंग्य कविता यातला मूलभूत फरक काय?
उत्तर : हास्य हा निर्मळ आनंदाचा क्षण असतो. तो आपल्या शरीरात भौतिक-रासायनिक प्रक्रिया घडवून आणत असतो. हास्याने आपण आनंदविभोर होत असतो. पण व्यंग्य ज्याला मराठीत उपहास म्हणाल ते करूणेतून जन्म घेतो. त्यामागे दु:खाची सावली असतेच. हसण्याला काळ वेळ नसते. कारण असते असेही नाही. पण उपहासाला मात्र नक्कीच कारण असते.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

तुती हेअर मास्क केसांची हरवलेली चमक परत करेल जाणून घ्या फायदे

मोठ्या वेलचीचे पाणी हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे, हे 5 फायदे जाणून घ्या

10 मिनिटे ध्यान करण्याचे 10 फायदे जाणून घ्या

पौराणिक कथा : भीष्म पितामहाचे पाच चमत्कारिक बाण

Birthday Wishes For Mother In Marathi आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Show comments