Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळ्या जादूवर विश्वास हा ज्याचा त्याचा प्रश्न – रामू

Webdunia
विज्ञान आणि अंधश्रध्‍दा या विषयावर नेहमीच चर्चा होत आली आहे. 'मानो या न मानो'च्‍या आधारे या विषयाच्‍या आधारे नेहमीच वादही झाले आहेत. भूत, डरना मना है, वास्तुशास्त्र यासारख्‍या अनेक हॉरर चित्रपटांचे निर्माते राम गोपाल वर्मा यांचा 'फूँक' हा चित्रपट काळीजादू आणि अंधश्रध्‍दा याभोवती फिरतो. या चित्रपटाच्‍या विषयावरून रामगोपाल वर्मा यांची वेबदुनियाशी झालेली चर्चा …

प्रश्न :- तुमच्‍या 'फूँक' या चित्रपटाची कथा कशावर आधारीत आहे.
उत्तर :- 'फूँक' हा काळ्या जादूवर आधारित चित्रपट आहे. अनेक जण या प्रकारच्‍या जादूला मानतात. जर तुमचे कुणाशी वैर आहे. तर तुम्‍हाला संपविण्‍यासाठी तुमचा शत्रू अशा प्रकारच्‍या जादूटोण्‍याचा वापर करू शकतो. काही लोक समोरून तर काही लोक मागून ही जादू करीत असतात. 'फूँक'च्‍या कथेत या सर्व गोष्‍टींना अंधश्रध्‍दा समजणा-या अशाच एका व्‍यक्‍तीची कथा आहे. जो या सर्व गोष्‍टींवर अजिबात विश्‍वास ठेवत नाही. मात्र त्‍याला अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. विज्ञान आणि डॉक्‍टरही याबाबतीत कोणतेही स्‍पष्‍टीकरण देऊ शकत नाही.

प्रश्न :- काळ्या जादूबद्दल तुमचं मत काय? अशा घटनांमागे कोणती अदृश्‍य शक्‍ती असते का?
उत्तर :- माझा चित्रपट हे नाही सांगत की काळी जादू खरी की खोटी. ही अंधश्रध्‍दा आहे की आणखी काही. जर कुणासोबत किंवा त्‍याच्‍या शेजार-पाजा-यांसोबत अशा घटना घडू लागल्‍या तर तो विश्‍वास ठेवतो. ज्‍याच्‍यासोबत नाही घडत तो नाही ठेवत. ही तर ‘मानो न मानो’ सारखी ही गोष्‍ट आहे.

प्रश्न :- तुमच्‍या चित्रपटासाठी तुम्‍ही हाच विषय का निवडला?
उत्तर :- काळ्या जादूवर आतापर्यंत कुणीही चित्रपट बनविला नव्‍हता. हा नवा विषय आहे. त्‍यामुळे मला असा चित्रपट बन‍वायचा होता. हा चित्रपट पाहिल्‍यानंतर प्रत्‍येकाला वाटेल की हे सर्व माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांसोबतच घडतंय. या चित्रपटाचा विषयच असा आहे, की ज्‍यावर भरपूर वादविवाद करता येतील.

प्रश्न :- चित्रपटात नवख्‍या कलावंतांना संधी देण्‍याचे कारण काय?
उत्तर :-माझ्या चित्रपटासाठीचे कलावंत मी चित्रपटाच्‍या आणि कथेच्‍या गरजेनुसार निवडत असतो. या चित्रपटात मला असे लोक हवे होते. ज्‍यांची प्रेक्षकांच्या मनात कोणतीही इमेज तयार झालेली नाही. आणि म्‍हणून मी ही निवड केली.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा

चिकन फ्राईड राइस रेसिपी

झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

Show comments