Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'तन्हा' हा फुलांचा गुच्छ - अमित

Webdunia
इंडियन आयडॉलच्या सुरवातीपासून चर्चेत आलेला गायक व छोट्य ा पडद्यावरील कलाकार तसेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अमित टंडनने अल्पावधीत स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अमितने नुकताच त्याचा स्वत:चा ' तन्हा' अल्बम रिलीज केला आहे. ' तन्हा' विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमितशी साधलेला संवाद....

तुझ्या नवीन अलबमविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
नुकताच ‘'तन्हा' नावाचा माझा पहिला अल्बम प्रदर्शित झाला आहे. कारण, इंडियन आयडॉलनंतर एक अल्बम बनविण्याची माझी इच्छा होती. यामध्ये माझ्या आवडीची गाणी आणि संगीत आहे. फुलांच्या गुच्छाप्रमाणे अनेक प्रकारची गाणी मी या अलबममध्ये गुंफलेली आहेत. त्यांचा व्हिडीओ देखील चांगला आहे.

एका कलाकारासाठी त्याचा पहिला अल्बम अत्यंत महत्त्वाचा असतो. तू विवाहीत आणि एका सूखी कुटूंबाबरोबर राहत आहेस. तर मग या अलबमचे नाव तू ‘'तन्हा' असे का ठेवले?
होय, मी माझ्या वैवाहिक जीवनात अत्यंत खूश आहे. पण अल्बमचे नाव ‘तनहा’ ठेवण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे अल्बमचे टायटल सॉंग आणि टायटल व्हिडीओ ‘तन्हा हूँ मैं’ असे आहे. जेव्हा लोक गाणं आणि व्हिडीओ बघतील त्यावेळी त्यांना या अल्बमचे नाव योग्य असल्याची खात्री पटेल.

WD
अल्बममध्ये किती गाणी आहेत?
अल्बममध्ये एकूण 14 गाणी असून त्यापैकी चार ओरीजनल गाण्याची रिमिक्स आहेत. यामध्ये पॉप रॉक, पंजाबी आणि रोमॅंटिक हिंदी गाण्याचा समावेश आहे. पॉप रॉक गाण्याबरोबरच सुफी गाणेही आहे. मला जी गाणी आवडतात त्याचप्रकारची गाणी मी अल्बबममध्ये घेतली आहेत. मी पंजाबी म्युझिकचा खूप मोठा फॅन आहे. गुरूदासमानजींची गाणी मी नेहमी ऐकत असतो. हल्ली मी पंजाबी म्युझिकही ऐकतो. तसेच, हिंदी रोमॅंटिक गाणीही ऐकायला मला फार आवडतात. या सर्व बाबी लक्षात ठेवूनच मी अल्बम तयार केला आहे. ‘तन्हा हूँ मैं’ च्या तालावर हिप हॉपचा फ्लेवर येतो. गाण्याच्या बोलावर विशेष ध्यान देऊन त्याचा अर्थ लागेल असे तयार केले आहे.

तू आपल्या अल्बममध्ये चार रिमिक्स गाणी का टाकली आहेत. त्याचे कारण काय?
हा माझा पहिलाच अल्बम असल्याने मी प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नव्हतो. कारण, तो माझा आवडता अल्बम असून जेव्हा आपण एखादे काम पहिल्यांदाच करत असतो. तेव्हा मनात एक वेगळाच विचार असतो. प्रेक्षकांना पहिल्यांदा काहीतरी नवीन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सुरवातीला दोन व्हिडीओ तयार झाले असून तिसरा आणि चौथा व्हिडीओ लवकरच तयार केला जाईल.

‘तन्हा’ मधील गाण्याच्या व्हिडीओबद्दल थोडे सांग?
यामधील गाण्याचा व्हिडीओ एकदम आगळा-वेगळा असावा, असा विचार मी केला होता. सध्या हिंदी चित्रपटाचा एवढा प्रभाव आहे की, पॉप अल्बम कुठे लपून जातात हे कळतच नाही. माझी ओळख निर्माण करण्यासाठी माझा व्हिडीओ देखील वेगळा असावा, असे मला वाटले होते. मी त्याचा लूक बराचसा इंटरनॅशनल ठेवला आहे. ‘तन्हा’ च्या टायटल ‍व्हिडीओ सॉंगमध्ये ब्लॅक अँड व्हाइट सेटिंग ठेवले आहे. संपूर्ण व्हिडीओ माझ्यावरच चित्रित करण्यात आला आहे.

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

Show comments