Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संगीत हेच माझे दैवत- सोनू निगम

- भीका शर्मा

Webdunia
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या सुपरहिट गाण्यामधून आपली ओळख करून दिली आहे. सोनूचे अलीकडेच तीन अल्बम बाजारात आले आहेत. त्याच्या एकूणच कारकिर्दीसंदर्भात त्याच्याशी मारलेल्या या गप्प ा...


प्रश्न : आपण पार्श्वगायन कमी केले होते, काय हे खरे आहे काय?
होय, हे खरे आहे. गेल्या वर्षभरात असे घडले खरे. गेल्या वर्षी मी अमेरिकेत वर्ल्डवाइड टूरवर होतो. अमेरिकेतच माझ्या मुलाने जन्म घेतला. तिथेच इतर कामात मी व्यस्त होतो. गेल्या एक वर्षापासून मी भारतात आहे. 'रब ने बना दी जोडी' व 'राज' या चित्रपटांमध्ये माझी गाणी होती. आगामी काळातही काही गाणे येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत कमी कामे मी करतोय. कुटुंबासाठी मी जास्त वेळ देतोय.


प्रश्न : रियलिटी शोच्या माध्यमातून तयार होणार्‍या गायक-गायिकांना अल्बमच्या क्षेत्रात किती संधी आहे?
हल्लीच्या काळात खासगी अल्बम चालत नाहीत. परंतु, गेल्या वर्षी मी तीन व माझ्या वडिलानी पाच वर्षांत चार अल्बम काढले. ते सुपरहिट झाले आहेत. नवोदित गायक स्वत:चे अल्बम काढू शकतात. कुठल्याही गोष्टीला चांगले मांडले तर ती लोकांना आवडते. याचा मला चांगला अनुभव आहे. कुठलेही काम जीव ओतून केले तर त्याला हमखास यश हे मिळतेच. आपल्या कामावर आपण नेहमी प्रेम केले पाहिजे. संगीतावर माझे जीवापाड प्रेम आहे. चित्रपट संगीत, गजल, भजन, कव्वाली किंवा सूफी संगीताकडे नवदित गायकाना लक्ष द्यावे लागेल, तरच संगीत क्षेत्रासह देशाचा विकास होईल, असे मला वाटते.

प्रश्न : संगीतासंदर्भात सध्या तुम्ही काय करत आहात?
संगीत हे माझे दैवत असून मी प्रत्येक क्षणाला त्याची पूजा करत असतो. मी एकदा गायकांची संघटना तयार करण्याची योजना केली होती. मात्र, ती काही कारणास्तव होऊ शकली नाही. गेल्या वर्षी माझे 'क्लासिकली माइल', 'रफी री सरेक्टेड' व 'महा कनेक्शन' हे तीन अल्बम आले. मला स्वतं‍त्र काम करायला आवडते. संगीत चित्रपटाचे एक अंग आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये नायक व नायिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, भारताबाहेर गायक-गायिका, नायक-नायिका व खेळाडू यांना सगळ्याना समान स्थान आहे. कोणातच भेदभाव केला जात नाही. भारतात संगीत क्षेत्राची उपेक्षा होते. त्यामुळे या संगीताला सन्मान देण्यासाठी काम करतोय.

प्रश्न : संगीतविषयक एखादे पुस्तक लिहिण्याचा तुमचा विचार आहे काय?
होय नक्कीच. मी याबाबत खूप विचार केला असून भविष्यात मी संगीत क्षेत्राला योगदान ठरणारे पुस्तक लिहिणार आहे. परंतु, कामाचा एवढा व्याप आहे की, लिहायला वेळच मिळत नाही. पुस्तक लिहिण्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे. मला दीड वर्षाचा मुलगा आहे. सध्या मी त्यालाच पूर्ण वेळ देऊ शकत नाही. परंतु, भविष्यात पुस्तक लिहिणार हे नक्की.

प्रश्न : तलत अझीझ यांच्याबरोबर आपला अल्बम आला आहे. त्यांच्याविषयी काय वाटते?
तलतजी व मी मिळून एक गझल अल्बम काढला आहे. त्यात माझी केवळ एकच गझल आहे. तलतजी माझे आवडते गायक आहे. सेलीब्रिटीपेक्षा आपण एक चांगली व्यक्ती असायला पाहिजे, असे मला वाटतं. तलतजींचा खूप स्वभाव चांगला आहे. मला अशा लोकासोबत काम करायला आवडते.

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

वजन कमी करण्यासाठी डाईट मध्ये सहभागी करा ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात टाचांना तडे जात आहे, अवलंबवा हे घरगुती उपाय

आइस्ड टी प्यायल्याने शरीराला हे 7 फायदे होतात, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

चेहऱ्याच्या समस्येसाठी दह्याचा वापर करा फायदे आणि तोटे जाणून घ्या

Show comments