छत्रपती शिवाजी महाराज-सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देखणे आणि शूर होते. ते अनेक भाषांत विाविशारद व धुरंदर राजकारणी होते.
राजकारणातील बारकावे त्यांनी आत्मसात केले होते. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत छत्रपती संभाजीराजे राजकारणातील लहानसहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले. छत्रपती संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता.
छत्रपती संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. याप्राणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो.
16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मुघल सम्राट औरंगजेबाला वाटले की तो आता रायगड किल्ला सहज काबीज करेल. पण रायगडच्या सत्तेवर छत्रपती संभाजी महाराज बसताच औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला केला तेव्हा तो छत्रपती संभाजीकडून पराभूत झाला. छत्रपती संभाजी महाराजांकडून वारंवार पराभवानंतर, सम्राट औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली. तो मुघलांना जाऊन सामील झाला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र केशव राजकीय कार्यानिमित्त संगमेश्वरातून रायगडावर परत जात असताना संभाजींवर रागावलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजीं महाराजांना आपल्या ताब्यात घेऊन क्रूरतेच्या आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांची जीभ कापली आणि डोळे काढले. तुळापूरच्या नदीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे विकृत तुकडे फेकले असता काठावर राहणाऱ्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवण टाकून पूर्ण पध्दतीने अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते. अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले.