Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरक्षणाच्या मुद्यावरून राठोड अनुपस्थित

वार्ता
बुधवार, 23 जुलै 2008 (15:22 IST)
भाजपचे सरकार भटक्या जमातींसाठी आरक्षण देईल किंवा नाही यासंदर्भात संभ्रमात असल्याने आपण काल झालेल्या मतदानात भाग घेतला नाही, असा खुलासा भाजपचे यवतमाळ येथील 'बंडखोर' खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. श्री. राठोड काल मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.

श्री. राठोड हे गोपीनाथ मुंडे यांच्या खास मर्जीतील मानले जातात. पण तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले असावे याविषयी चर्चा होती. त्याविषयी आपली बाजू स्पष्ट करताना राठोड म्हणाले, की देशात भटक्या जमातीच्या लोकांची संख्या १५ कोटी आहे. या जमातीसाठी अनुसूचित जाती व जमातीसारखी घटनेत तिसरी अनुसूची बनवावी अशी आपली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातही या जमातीला आरक्षण मिळायला हवे. पण या राज्यांतील भाजप सरकार काहीही करत नाही, असा त्यांचा आरोप आहे.

' गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये आलो हे सांगताना मुंडे यांनाच पक्षाने बाजूला केले आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत आपण प्रतिनिधित्व करतो त्या समाजाला न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही, असे श्री. राठोड म्हणाले.

या परिस्थितीत आपल्यावर मोठा तणाव होता. युपीएला मत द्यावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होती. तणावामुळेच आपली तब्बेत खालावली आणि दवाखान्यात दाखल व्हावे लागले, असे त्यांनी सांगितले.

आपल्या समाजाला भाजपकडून न्याय मिळणार नाही. त्यामुळे युपीए सरकार देशात सत्तेवर रहायला हवे, असे सांगून आपल्याला अनुपस्थित रहाण्यासाठी कोणतेही पैसे देण्यात आलेले नाही, असे ठाम शब्दांत सांगितले. आपण विकावू नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आपण आजही भाजपचे सदस्य आहोत. पण पक्षाने आपल्याला काढले तर समाजाला न्याय देणार्‍या पक्षात जायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत असेही ते म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments