Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू
, बुधवार, 15 जुलै 2020 (09:09 IST)
राज्यात मंगळवारी ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात दोन लसीवर मानवी चाचणीला परवानगी