rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात १ हजार बेडचे रुग्णालय

1000 bed
, मंगळवार, 5 मे 2020 (09:46 IST)
कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्स येथे रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाल्यानंतर आता ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेला दिले आहेत. 
 
ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय पथकाने देखील ठाण्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकी घेतली. इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची विभागणी करुन उपचार केले जातील. 
 
कोरोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात करण्यात येणार आहे. येथे १००० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४ हजाराच्या वर