Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

Webdunia
मंगळवार, 9 जून 2020 (20:34 IST)
राज्यात  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत  कलम १८८ अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
 
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ८४,५१७ वाहने जप्त करण्यात आले. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
 
पोलीस विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक १०० वर,या काळात १,००,९५८ दूरध्वनी आले. त्या सर्वांची दखल घेण्यात येऊन संबंधितांना दिलासा देण्यात आला.
 
आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ६६९ पासेस पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार४९६ व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
 
ज्यांच्या हातावर कॉरंटाईन असा शिक्का असलेल्या ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९१,४९६ व्यक्ती कॉरंटाईन करण्यात आले आहे.
 
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०२ पोलीस अधिकारी व १२८६ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
रिलिफ कॅम्प
राज्यात सध्या एकूण २८६ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १३,१८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

अबू आझमी यांची बीएमसी निवडणुक एकट्याने लढण्याची घोषणा

भंडारा येथे शालेय क्रीडा महोत्सवा दरम्यान दोन गटात हाणामारी

LIVE: रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी,पूर्व महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती

रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी,पूर्व महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती

लातूरमध्ये हॉस्पिटलच्या गार्डला बेदम मारहाण मृत्यु, डॉक्टरसह 3 जणांना अटक

पुढील लेख
Show comments