Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात गुरुवारी ३,५७९ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात गुरुवारी ३,५७९ नवीन रुग्णांची नोंद
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:00 IST)
राज्यात गुरुवारी ३,५७९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९,८१,६२३ झाली आहे. राज्यात ५२,५५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,२९१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, ठाणे ६, नाशिक ५, अहमदनगर ३, पुणे ८, पिंपरी चिंचवड ३, सोलापूर ४, कोल्हापूर ३, नागपूर ६, वर्धा ५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू अमरावती ४, भंडारा २, कोल्हापूर २, नागपूर २, पुणे २, बुलढाणा १, नाशिक १ आणि सिंधुदुर्ग १ असे आहेत.
 
तर ३,३०९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ (१४.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेणू शर्मा प्रकरणातील कोण आहेत कृष्णा हेगडे ?