suvichar

राज्यात ३ हजार ७९१ नवीन कोरोनाबाधित दाखल

Webdunia
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:26 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. शिवाय कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडत आहे. मंगळवारी दिवसभरात १० हजार ७६९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर आतापर्यंत १५ लाख ८८ हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के झाले आहे. मंगळवारी राज्यात ३ हजार ७९१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९५ लाख ३६ हजार १८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २६ हजार ९२६ (१८.११टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ११ हजार ४ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, सध्या राज्यात एकूण ९२ हजार ४६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ट्विशा शर्मा प्रकरण: 'हा खून नाही, आत्महत्या आहे' - भोपाळ पोलीस आयुक्तांचा मोठा दावा

वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची आता राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्ती

LIVE: मुंबईतील हॉटेल्सना 'चीज अॅनालॉग' लेबल अनिवार्य

सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर जाणून घ्या

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments