Marathi Biodata Maker

राज्यात ४ हजार १३० नवीन करोनाबाधित

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (22:25 IST)
राज्यात शनिवारी करोनातून बरे झालेल्यांपेक्षा जवळपास दुप्पट संख्येने नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ४ हजार १३० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ५०६ जण करोनामुक्त झाले आहेत. शिवाय, ६४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. त्यामुळे राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे, असं जरी बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. 
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८२,११७ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७७०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझटिव्हि आले आहेत. सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०१३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५२,०२५ अॅक्टिव्ह आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये आई आणि मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

मालेगाव-सटाणा रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी, मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

LIVE: पुणे बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होईल

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू ट्रोलर्सवर संतापले

पवार कुटुंबातील सदस्यां विरुद्ध पुन्हा निवडणूक लढवणार नाही,सुप्रिया सुळे यांचे विधान

पुढील लेख
Show comments