Dharma Sangrah

राज्यात ४७ हजार ८२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:17 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका आता अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. शुक्रवारी राज्यात ४७ हजार ८२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चार हजारहून अधिकने वाढला. तसेच २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९१ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
शुक्रवारी महाराष्ट्रात ४७ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असतानाच २४,१२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के इतके झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

हेल्मेट किंवा सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे अडचणीत आणेल! दंडासोबतच तुमचा परवानाही निलंबित केला जाईल

राहुल गांधी नेहमी स्वप्नांच्या दुनियेत वावरतात; मंत्री संजय शिरसाठ यांची टिपण्णी

अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

पुढील लेख
Show comments