राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. सोमवारी राज्यात ५९ हजार ५०० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४८ हजार ६२१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय ५६७ रूग्णांचा सोमवारीमृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.७ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ७० हजार ८५१ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.