Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण

Webdunia
गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (09:16 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची  दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. मात्र राज्यात अजुनही दररोज हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे  होत असलेल्याच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 043 रुग्ण बरे झाले आहेत. तर 960 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.
 
 राज्यात बुधवारी  41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 807 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात 84 हजार 261 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर, 1084 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात  आहेत. राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण  आहेत.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments