Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेल्टा प्लस रुग्णांत वाढ, या जिल्ह्यात सापडले नवीन रुग्ण

डेल्टा प्लस रुग्णांत वाढ, या जिल्ह्यात सापडले नवीन रुग्ण
, मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (09:44 IST)
राज्यात कोरोना प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली असली तरी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट नं डोकं वर काढलं आहे. सोमवारी राज्यात डेल्टा प्रकाराचे 10 रुग्ण दिसून आले आहेत. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात त्यांची संख्या 76 झाली आहे. 
 
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्यांची रुग्ण संख्या :
मुंबई : 11
जळगाव : 13
रत्नागिरी : 15
कोल्हापूर : 07
ठाणे : 06
पुणे : 06
रायगड : 03
पालघर : 03
नांदेड : 02
गोंदिया : 02
सिंधुदुर्ग : 02
चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद,बीड याठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण
 
राज्यात सोमवारी 4,145 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी मिरज कोल्हापुरातून सहा, रत्नागिरीतील तीन आणि सिंधुदुर्गातून डेल्टाचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या दरम्यान डेल्टा प्रकारामुळे राज्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 76 रुग्ण डेल्टा विषाणूमुळे ग्रस्त आहेत. त्यापैकी 10 लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत तर 12 लोकांकडे एकच डोस आहे. या रुग्णांमध्ये 39 महिला आणि नऊ मुले आहेत.ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. डेल्टा विषाणूमुळे ग्रस्त 39 रुग्णांचे वय 19 ते 45 वर्षे दरम्यान आहे. त्याच वेळी 19 लोकांचे वय 46 ते 60 च्या दरम्यान आहे, तर नऊ लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. यातील 37 लोकांना सौम्य संसर्ग झाला आहे. 
 
सोमवारी राज्यात 4,145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 811 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 95 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86 टक्के आहे. राज्यात आज 100 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. संध्याकाळी 6 पर्यंत महाराष्ट्राने रहिवाशांना कोविड 19 लसीचे 6.08 लाख डोस दिले, ज्यामुळे एकूण लसीचा आकडा 5 कोटी झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळले