गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला होता. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूंचे एकूण सहा रुग्ण सापडले. त्यापैकी कोल्हापूर शहरात 3, हातकणंगले मध्ये 2 व निगवे दुमाला मध्ये 1 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण विचारे माळ इथला असून दोन रुग्ण सानेगुरुजी वसाहतींमधील आहेत. जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.