Marathi Biodata Maker

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी टास्क फोर्सचा मोठा निर्णय

Webdunia
गुरूवार, 4 जानेवारी 2024 (20:53 IST)
मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
 
यापुढे कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. राज्यात सध्या ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या दहा दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढलीये. त्यामुळे कोरोना झाल्यास आधी गृहविलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्यात. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच अशा व्यक्तींना कुटुंबातील कोरोना झालेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे असे सांगण्यात आलेय.
 
राज्यात कोरोनासह जेएन १ चे रुग्ण देखील वाढत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एकूण ८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळेत. बुलढाणा जिल्ह्यात नव्याने ७ कोरोना संसर्गितांची भर पडली आहे. त्यात शेगाव येथील २ चिखली येथील २ (महिला ) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण ४ जणांचा समावेश आहे.
 
प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी रोजी पहिला कोरोना संसर्गित आढळून आला आहे. आता नव्याने ७ जण संसर्गीत आढळल्याने एकूण संख्या ८ झाली आहे. शिरपूर येथील ५० वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेल स्त्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

कोलंबियामध्ये हिंसक हल्ले सुरूच, बसमधील भीषण बॉम्बस्फोटात सात जण ठार

नागपूरमधील बारलिंगे चौकात अपघात, कारने धडक दिल्याने एका ७२ वर्षीय योग शिक्षिकेचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारने लडकी बहिण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपये वसूल केले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोर जागीच ठार

SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला पाच गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments