Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश

coronavirus
, मंगळवार, 17 मार्च 2020 (12:13 IST)
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली आहे. कोरोना व्हायरसबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकाराच्या अफवा पसरत आहेत. काय प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे आवश्यक आहे? याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिशा-निर्देश जारी केले आहेत.
 
इकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या सामुदायिक संप्रेषणाची भीती लक्षात घेत इन्फ्लुएंझा आणि न्युमोनिया सारख्या श्वसनाचे आजार असणार्‍यांची तपासणी देखील सुरू केली आहे. यात कुठल्याही प्रवाशाची हिस्ट्री नसलेल्या लोकांना देखील सामील केले आहे.
 
आरोग्या मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना लोकांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने सांगितले की व्हायरसचे कोणतेही समुदाय संप्रेषण पाहिले गेले नाहीत आणि आतापर्यंत केवळ संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्येच संक्रमण आढळले आहे.
webdunia
आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानुसार इन्फ्लूएंजा आणि गंभीर श्वसन संबंधी आजाराने पीडित रुग्णांचे सुमारे 1,040 सँपल एकत्र केले गेले आहे, जे वेगवेगळ्या रुग्णालयात भरती आहे. त्यापैकी कोणाचाही परदेशी प्रवासाचा इतिहास नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने व्हिडीओचे असे करा GIF फाईलमध्ये रुपांतर