Marathi Biodata Maker

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा

Webdunia
बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:33 IST)
एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून 1 कोटी रुपयांची मदत
कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. या सर्व दानशूर हातांच्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत.
 
कोराना विषाणूविरुद्ध लढताना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणूविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
 
कोरोना विषाणू विरुद्ध लढताना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याचा बचतखाते क्रमांक  39239591720 आहे.  
 
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 
 
Chief Minister’s Relief Fund-COVID 19 
Savings Bank Account number 39239591720 
State Bank of India, 
Mumbai Main Branch, 
Fort Mumbai 400023 
Branch Code 00300 
IFSC CODE- SBIN0000300 
 
मराठीत  
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19 
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 
स्टेट बँक ऑफ इंडिया, 
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023 
शाखा कोड 00300 
आयएफएससी कोड SBIN0000300 
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरात श्री राम यंत्राची स्थापना केली

महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर प्राणघातक मेनिंजायटीसचा कहर, लंडनमध्ये २७ रुग्ण, आरोग्य सतर्कतेचा इशारा

अघोरी पूजेपासून ते ब्लॅकमेलिंगपर्यंत, अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांचे ५ गंभीर खुलासे

LIVE: खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

विक्रेत्यांकडे आता क्यूआर कोड असतील; रेल्वे अवैध फेरीवाल्यांवर कडक कारवाई करणार

पुढील लेख
Show comments