Dharma Sangrah

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३ वर

Webdunia
शनिवार, 21 मार्च 2020 (16:51 IST)
राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ११ जणांपैकी १० जण हे मुंबईचे आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आले आहेत. तर ३ जणांना करोनाची बाधा संसर्गातून झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं ते म्हणाले.
 
राज्य सरकारच्यावतीनं मेडिकल कॉलेजमध्येही आम्ही चाचणी केंद्र उभारण्यास तयार आहोत. आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडेही याबाबत विनंती केली आहे. आम्ही यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पाळू असंही त्यांना सांगितलं आहे. राज्यात चाचणी केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

६०० हून अधिक भारतीयांना घेऊन दोन विशेष विमाने दिल्लीत दाखल, ऑपरेशन सुरू

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

पुढील लेख
Show comments