Dharma Sangrah

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, नियंत्रणासाठी केंद्राची पथक येणार

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (18:48 IST)
महाराष्ट्रात सतत रुग्णसंख्येची वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पाच महिन्यानंतर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. राज्यात २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून केंद्र सरकारही सतर्क झाली आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. 
 
राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. दरम्यान विदर्भात कोरोनाचा स्फोट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नागपूरातून 1183 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे दोन दिवसाचे विकेंड लॉकडाऊन असतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघाल्याचं चित्र आहे.
 
तर अमरावती जिल्हात आज दिवसभरात 631 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

व्हॅलेंटाईन डे दिवशी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज करणे पडले महागात; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

आधी हत्या, मग दारू पिऊन मृतदेहासोबत हैवानियत! प्रियकराच्या आत्म्याशी बोलण्यासाठी केले अघोरी कृत्य

एटीएममधून रेशन मिळणार! अमित शाह यांनी सीबीडीसी-आधारित पीडीएस मॉडेल लाँच केले

महिला अधिकाऱ्याने १.५ कोटींत १२ वर्षांनी लहान प्रियकराला त्याच्या पत्नीकडून विकत घेतले

मुंबई : जोडप्याला एसयूव्हीने धडक दिल्यानंतर ९ दिवसांनी तरुणाचा मृत्यू; अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर कारवाई

पुढील लेख
Show comments