Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची लक्षणे असून उपचाराची भीती वाटत असल्याने आत्महत्या

कोरोनाची लक्षणे असून उपचाराची भीती वाटत असल्याने आत्महत्या
, शनिवार, 11 एप्रिल 2020 (16:12 IST)
आपल्याला कोरोनाची लक्षणे असून उपचाराची भीती वाटत असल्याने नाशिकमधील चेहेडी पंपिंग परिसरातील एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. शनिवारी  सकाळी ही घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून घशात त्रास होत असल्याच्या कारणास्तव त्रस्त झाल्याने मी आत्महत्या करत आहे, मला करोनाची लक्षणे असून मला उपचारांची भीती वाटत असल्याने मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले होते. प्रतिक राजू कुमावत (३१, रा. श्रीकृष्ण काॅलनी, चेहेडी) असे मृताचे नाव आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतिक कुमावत व्यवसायाने प्लंबर होता.  त्याने शनिवारी (दि.११) सकाळी “घशात त्रास होत असल्याच्या कारणास्तव त्रस्त झाल्याने मी आत्महत्या करत आहे, मला करोनाची लक्षणे असून मला उपचारांची भीती वाटत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी बेडरुमच्या दरवाजावर चिटकवून आतून दरवाजा बंद करत गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी मुलाने दरवाजा उघडला नाही म्हणून पहायला गेलेल्या वडिलांनी दरवाजावरील चिठ्ठी वाचल्यानंतर आरडाओरडा केली व दरवाजा उघडला. तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नगरसेवकाने केली वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी, गुन्हा दाखल