Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कोरोना वाढतोय !

coorna
, बुधवार, 15 जून 2022 (17:49 IST)
मुंबईत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मच्या BA.4 सब-व्हेरियंटचे तीन आणि BA.5 सब-व्हेरियंटचे एक प्रकरण नोंदवले गेले आहे. सर्व रुग्ण या आजारातून बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, BA.4 आणि BA.5 हे कोरोनाच्या अतिसंसर्गजन्य ओमिक्रॉन स्वरूपाचे सब व्हेरियंट आहेत. जागतिक महामारीची तिसरी लाट देशात ओमिक्रॉनमुळे आली.
 
आरोग्य विभागाने सांगितले की, महानगरपालिका संचालित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात महानगरातील तीन रुग्णांमध्ये BA.4 सब व्हेरियंट आणि एका रुग्णामध्ये BA.5 व्हेरियंट असल्याची पुष्टी झाली आहे. या चार रुग्णांमध्ये दोन मुली आणि दोन पुरुष आहेत. मुलींचे वय 11 वर्षे आणि पुरुषांचे वय 40 ते 60 वर्षे आहे. विभागाने सांगितले की, सर्व रुग्णांनी होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ते आजारातून बरे झाले आहेत.
 
राज्यात गेल्या 24तासांत 2956 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा18,267वर पोहोचला आहे. 
 
मुंबईत गेल्या 24 तासात 1724 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1083589वर पोहोचली आहे. तर 1052201 एवढे रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे एकूण 11813 सक्रिय रुग्ण आहेत.
 
आज महाराष्ट्रात एकुण 2956 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या परत वाढली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day Wishes फादर्स डे च्या शुभेच्छा