महाराष्ट्रात पुन्हा एकदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीचा आलेख कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजार 922 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.
या रुग्णांपैकी 1 हजार 765 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के आहे. मृत्यूदर 1.87 टक्के आहे.
सध्या 14 हजार 858 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. 10 हजार 47 सक्रिय रुग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.
राज्यात आज एकूण 1392 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,44, 905 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 टक्के इतकं झालं आहे.