कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगर ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तर पनवेल, उरण या ठिकाणीही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही तासात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८७२ झाली आहे, काल दिवसभरात कोरोनाचे ९३ रुग्ण आढळले होते. दिवसभरातली रुग्णसंख्या पाहाता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रादुर्भाव होतोय. औरंगाबाद शहरात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.