suvichar

कोरोनावर ९४ वर्षाच्या आजींची यशस्वी मात

Webdunia
कामेरी येथील ९४ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मिरज कोरोना रुग्णालयातुन करोनामुक्त ९४ वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला.
 
सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९४ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे ९४ वर्षे कोरोनामुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून १४ दिवसानंतर आजींची स्वाब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्ट मध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

पीव्ही सिंधू ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाही!

इराणचा नेतन्याहू यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा केला, इस्रायलने फेटाळला

इराणी ड्रोन हल्ल्यानंतर सौदी तेल शुद्धीकरण कारखाना बंद

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात बंदी घातलेल्या प्लास्टिकवर कारवाई, १३ महिन्यांत ५,१६८ किलो जप्त

पुढील लेख
Show comments