Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता

Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (07:10 IST)
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता आहे. ही ३० माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल. यासाठी ३० माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
 
सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे.त्यानुसार ही माकडे तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
 
अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments