Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात

Coronavirus in India LIVE updates
, गुरूवार, 25 मार्च 2021 (10:22 IST)
भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही मागील 5 महिन्यात ही एका दिवसातील उच्चांक आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात गुरुवारी २३ ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २१ तासात भारतात ५३ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले असूण २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
 
भारतात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ आहे. तर १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार १९२ इतकी आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ६९२ इतकी आहे. 
 
काळजीची बाब म्हणजे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, तर 31,855 नवे कोरोना रुग्ण दाखल