कोरोना महामारी कोविड-19 विषाणूच्या मानवनिर्मित प्रसाराबाबत सुरुवातीपासून व्यक्त करण्यात येत असलेल्या शंका खऱ्या ठरताना दिसत आहेत. आता चीनच्या वुहान प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने कोविड-19 विषाणू मानवनिर्मित असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
चीनमधील वुहान येथील वादग्रस्त लॅबमधील एका अमेरिकन शास्त्रज्ञाने दावा केला आहे की कोविड-19 हा मानवनिर्मित विषाणू होता आणि तो या प्रयोगशाळेतून बाहेर पडला होता. 'न्यूयॉर्क पोस्ट'ने ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' मध्ये यूएस स्थित संशोधक अँड्र्यू हफ यांच्या विधानाचा हवाला दिला आहे की कोविड दोन वर्षांपूर्वी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (डब्ल्यूआयव्ही) मधून लीक झाला होता. ही लॅब चिनी सरकारद्वारे चालवली जाते आणि निधी दिला जातो.
कोविड विषाणू मानवनिर्मित आणि वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरत असल्याचा दावा यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र, चीन सरकारने या दाव्यांचा सातत्याने इन्कार केला आहे. सरकारी अधिकारी आणि प्रयोगशाळेतील कर्मचारी या दोघांनीही या लॅबमध्ये विषाणूची उत्पत्ती झाल्याचे नाकारले आहे.