rashifal-2026

भारतात करोनाचा पहिला बळी, सौदी अरेबियातून आलेल्या रुग्णाचा कर्नाटकात मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 13 मार्च 2020 (10:40 IST)
करोना व्हायरसने भारतात आपला पहिला बळी घेतला आहे. कलबुर्गी येथील एका ७६ वर्षीय रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती दिली. 
 
मोहम्मद हुसेन सिद्दीकी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते सौदी अरेबियातून आले होते. त्यांच्या संपर्कात जवळपास 43 जण आले होते. आता या 43 जणांचा शोध घेण्यात येतोय.
 
सिद्दीकी यांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते. 
 
देशातील 7 राज्यांमध्ये करोनाचे 16 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या 76 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर

15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांपूर्वी, आक्रमणकर्त्यांना वाटले की ते जिंकले आहेत, आपल्या पूर्वजांनी महादेवासाठी सर्वस्व अर्पण केले, असे सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदी म्हणाले

19 वर्षाच्या तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार

ओडिशामध्ये चार्टर्ड विमान कोसळले, 2 वैमानिकांसह 6जण जखमी

पुढील लेख
Show comments